भाजपने जम्मू-काश्मीर विधानसभेची ४४ उमेदवारांची यादी घेतली मागे
BJP withdrew the list of 44 candidates for Jammu and Kashmir Legislative Assembly

जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने सोमवारी २६ ऑगस्ट रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये एकूण ४४ उमेदवारांची नावं होतं.
जम्मू – काश्मीरमधील वेगवेगळ्या जागांसाठी त्यांना तिकीट, उमेदवारी देण्यात आली होती. पण भाजपने जम्मू – काश्मीर विधानसभेसाठी उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर केवळ दोन तासात ही यादी मागे घेतली.
भाजपने यादी मागे घेतल्यानंतर ते आता या यादीमध्ये काही बदल करणार असल्याची चर्चा आहे. नव्या बदलांसह पुन्हा नव्याने उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यात सध्या बैठक सुरू होती. त्यांच्या बैठकीनंर पुन्हा नवी यादी जाहीर झाली आहे.
सोमवारी १२ वाजता ४४ उमेदवारांची पहिली यादी मागे घेतल्यानंतर भाजपकडून तासाभरात नव्याने १५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
सोमवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी जवळपास १० वाजता भाजपकडून जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली होती.
रविवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ४४ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.
त्यानंतर सोमवारी १० वाजता यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र यादी जाहीर झाल्याच्या केवळ दोन तासांत दुपारी १२ वाजता ही यादी परत मागे घेण्यात आली.
मागे घेतलेल्या उमेदवारांच्या नावांच्या यादीत बदल केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. भाजप ४४ उमेदवारांच्या यादीत नेमकं काय बदल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, जम्मू – काश्मीरमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. भाजपने जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उमेदवारांची नावं जाहीर केली होती.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य होते. मात्र भाजपने उमेदवारांची यादी मागे घेतली आहे.