Sharad Pawar’s U-turn;शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याच्या मुद्यावर शरद पवारांचा यु टर्न

Sharad Pawar's U-turn; Pawar's U-turn on the issue of Sharad Pawar-Ajit Pawar coming together

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे,

 

दरम्यान याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन्ही पवार कधी एकत्र येणार? असा थेट प्रश्न विचारण्यात आला, याला उत्तर देताना ते मला माहीत नाही असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.

हे सुद्धा वाचा ..!थेट गृहराज्यमंत्र्यांनीच मध्यरात्री टाकली बारवर धाड;पोलीस खात्याचे पितळ उघडे पडले

दरम्यान दोन्ही पवार एकत्र कधी येणार? या प्रश्नला उत्तर देताना शरद पवार यांनी थेट एकत्र येणार किंवा एकत्र येणार नाही? याबाबत कोणतंही वक्तव्य न करता कधी एकत्र येणार ते मला माहिती नाही असं म्हटलं आहे,

 

त्यामुळे आता शरद पवार यांच्या या वक्तव्यानं चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा ..!मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात ,अजितदादा, एकनाथ शिंदे पेक्षा शरद पवार भारी ; तोंडभरून कौतुक

‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हा प्रश्न जसा तुम्हला पडला आहे, तसाच अनेकांना पडला आहे. दोन्ही पवार एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. वरिष्ठांनी याबाबत काहीही सांगितलेलं नाही.

 

एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, आजपर्यंत ही फक्त चर्चा आहे, वरिष्ठ पातळीवर पवार साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील

हे सुद्धा वाचा ..!थेट गृहराज्यमंत्र्यांनीच मध्यरात्री टाकली बारवर धाड;पोलीस खात्याचे पितळ उघडे पडले

यांनी याबाबतीत आम्हाला कुठेही काहीही सांगितलेलं नाही, जर आम्हाला काही कळालं तर आम्ही नक्कीच मीडियासमोर येऊन बोलू,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार साहेब आणि अजितदादांची बोलणी सुरू आहेत असं म्हणतात. मात्र याबाबत सध्या भाकीत करणं उचित नाही,

हे सुद्धा वाचा ..!Maharashtra Corona Alert;पुढील २८ दिवसांत कोरोनाची चौथी लाट येणार? पुन्हा लॉकडाऊन, काय घडणार?

परंतु काही दिवसांनंतर तुम्हाला याचं चित्र स्पष्ट होईल. शरद पवार साहेब पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेला चाललो असं सांगतात. म्हणून ते जे बोलले मला माहिती नाही

 

याचा अर्थ सर्व गोष्टी त्यांना माहिती आहेत, फक्त नेमकं कोणत्या वेळेला याचा मुहूर्त ते शोधत आहेत, असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा ..!Maharashtra Breaking News;महायुतीतील एक पक्ष सत्तेतून बाहेर पडणार

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना जोर मिळत आहे.

 

या चर्चांना उधाण येण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर एकत्रितपणे दिसून आले होते.

हे सुद्धा वाचा ..!आता गुरुजींसाठी टेन्शनची बातमी ; ज्येष्ठ शिक्षकांचीही होणार ‘परीक्षा

त्यानंतर, दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर काही नेत्यांकडून दावे आणि प्रतिदावे करण्यात आले. परंतु आता शरद पवारांच्या यु टर्न मुळे काय होणार हा चर्चेचा विषय

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *