राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी,पाहा कोणाला मिळाली संधी
Swearing-in ceremony of seven MLAs appointed by the Governor, see who got the opportunity
राज्यपाल नियुक्त सात आमदारांचा शपथविधी विधानसभेत सुरु आहे. विधानपरिषदेचे सात आमदार आज निवडले गेले आहेत. उपसभापतींच्या उपस्थितीत या सात जणांना आमदारकी देण्यात आली आहे.
आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होणार आहे. त्याआधी या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होत्या.
विधान परिषदेसाठी निवडलेले गेलेले सात आमदार कोण?
हेमंत पाटील, शिवसेना (एकनाथ शिंदे)
मनिषा कायंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे)
पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
इद्रिस इलियास नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
महंत बाबूसिंग महाराज, बंजारा समाजाचे धर्मगुरु (भाजपा)
विक्रांत पाटील (भाजपा)
चित्रा वाघ (भाजपा)
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांकडून याचिका कोर्टात सादर करण्यात आली.
निकाल राखून ठेवताना कोणतेही निर्देश नव्हते असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. त्यानंतर आम्ही कोणतंही आश्वासन कोर्टाला किंवा याचिकाकर्त्यांना देण्यात आलेलं नाही.
महंत बाबूसिंग महाराज हे बंजारा समाजाचे धर्मगुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी पोहरादेवीचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांना सगळी माहिती देण्याचं काम बाबूसिंग महाराज यांनी केलं होतं.
त्याचप्रमाणे विक्रांत पाटील आणि चित्रा वाघ यांनाही भाजपाने विधान परिषदेची आमदारकी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते हेमंत पाटील हे तिकीट कापल्याने नाराज झाले होते
त्यांना आता विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली आहे. तर मनिषा कायंदे या सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेच्या आमदार झाल्या आहेत.
कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका आणि इतर काही अन्य याचिकांवर गेल्याच आठवड्यात सुनावणी पार पडली.
त्यावेळी या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण करुन हायकोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे. अद्याप हा निकाल आलेला नाही, तसेच तो कधी येईल याचीदेखील शाश्वती नाही.
याबाबत स्पष्ट करताना निर्णय राखून ठेवताना हायकोर्टानं याप्रकरणी कोणतेही निर्देश सरकारला दिलेले नव्हते, त्यामुळे नियुक्त्या कायदेशीर असून त्या करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा असल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील ठाकरे गटानं राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीला स्थगिती मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते. तेव्हाही उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. तिच परिस्थिती आता पाहायला मिळाली.
दरम्यान राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असताना राजकीय नेत्यांचीच वर्णी लावली जात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अनेकदा या नियुक्त्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नव्हती.
दरम्यान, निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी राज्य सरकारने सात आमदारांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने (ठाकरे) मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. मात्र उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही.
विधान परिषदेवरील राज्यपालनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीला कोणत्याही प्रकारची अंतरिम स्थगिती नव्हती किंवा सरकारनेही या नियुक्त्या करणार नाही अशी हमी दिली नव्हती.
त्यामुळे, आम्ही १२ पैकी ७ जणांच्या नियुक्त्या केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. न्यायालयाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवलेला असताना या नियुक्त्या केल्याची बाब ठाकरे गटाच्या याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर राज्य सरकारने उपरोक्त दावा केला आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी (याचिकाकर्ते) न्यायालयाला सांगितलं की, न्यायालयाने निर्णय राखून ठेवताना कोणतेही निर्देश दिले नव्हते, अस असताना महायुतीने आमदारांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
त्यावर राज्य सरकारकडून अधिवक्ते म्हणाले, न्यायालयाने आमदारांच्या नियुक्त्या करू नका असं म्हटलं नव्हतं. तसेच आम्ही नियुक्त्या करणार नाही असं सरकारने देखील न्यायालयाला सांगितलं नव्हतं. नियुक्त्या करण्यावर न्यायालयाने देखील अंतरिम स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे महायुतीने या नियुक्त्या केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारने घाईघाईने निर्णय घेत राज्यपालांकडे शिफारस केली. यामध्ये भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,
प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांची नावे देण्यात आली आहेत. शिवसेनेच्या (शिंदे) कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर राष्ट्रवादीकडून (अजित पवार) पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे.