महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय

Kejriwal took a big decision regarding Maharashtra and Jharkhand assembly elections

 

 

 

हरियाणातील काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीचे नेते सावध झाले आहेत. फाटाफुटीचा महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसू नये म्हणून

 

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम आदमी पार्टीने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आम आदमी पार्टीच्या या खेळीमुळे दोन्ही राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो असं सांगितलं जात आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे.

 

आपने इंडिया आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती. मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता.

 

ही मत विभागणी टाळण्यासाठी आता आपने मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या दबावामुळेच आपने हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे.

 

नुकतेच हरियाणा विधानसभेचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत आपला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. आपने हरियाणात 88 जागांवर उमेदवार उमेदवार उभे केले होते.

 

त्यापैकी 87 जागांवर त्यांचा अत्यंत दारूण पराभव झाला होता. त्यामुळेच आपने आता महाराष्ट्रात निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

महाराष्ट्रातील आप नेत्यांना काही जागांवर निवडणूक लढवायची होती. पण आपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याला नामंजुरी दिल्याचं सांगितलं जात आहे.

 

 

आम आदमी पार्टीचा सर्वात चांगला बेस दिल्लीत आहे. दिल्लीत आपची सत्ता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत आपला दिल्लीत मोठा पराभव पत्करावा लागला होता.

 

त्यामुळे आपने इतर राज्यांच्या निवडणुकीत गुंतून न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी जास्तीत जास्त फोकस दिल्लीवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

दिल्लीत विधानसभेवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी अरविंद केजरीवाल हे खास रणनीती आखण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *