आठवलेंच्या पक्षाला एकही जागा नाही,आठवले भयानक नाराज,मोदी सरकारचा पाठिंबा काढणार काय ?

Athawale's party does not have a single seat, Athawale is terribly upset, will the Modi government withdraw its support?

 

 

 

महायुतीचं जागावाटप सुरू झालं असून जवळपास बहुतेक जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित उमेदवार येत्या दोन दिवसांत जाहीर होतील.

 

दरम्यान, महायुतीतील नाराजीनाट्य आता समोर येऊ लागले आहे. महायुतीतील घटकपक्ष रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाने नाराजी उघड केली आहे. महायुतीतील नेत्यांनी आमचा विचार केला नसल्याचं ते म्हणाले.

 

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर चर्चा झाली. रिपब्लिकन लहान पक्ष असला तरीही जनता जनार्दनचा पाठिंबा आहे.

 

आम्हाला १०-२० जागा नको होत्या. चार पाच जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही रिपब्लिकनच्या मतांचा फायदा होणार आहे. पण तरीही महायुतीच्या नेत्यांनी आमचा विचार केला नाही.”

 

 

“आमची यादी त्यांना दिली होती. आम्ही त्याग केला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली विकास होत आहे, महाराष्ट्रातही चांगलं काम चाललंय.

 

 

त्यामुळे महायुतीबरोबर राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. रिपब्लिकन पक्षाकडे मोठं समर्थन आहे. त्यामुळे फडणवीसांची भेट घेऊन मुंबईतील एक जागा देण्याची मागणी केली आहे.

 

एक-दोन जागा मिळाव्यात याकरता आग्रहही केला आहे. त्यामध्ये धारावी किंवा चेंबूरच्या जागेवर मागणी केली आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.

 

कार्यकर्ते नॉमिनेशन साठी जाणार नाही असे म्हणत आहेत. 2012 मध्ये भाजपसोबत आम्ही भाजपसोबत आलो पण आता आरपीाय कुठे दिसत नाही.

 

यासंदर्भात मी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली. धारावी किंवा चेंबूरची जागा मिळावी हा आमचा आग्रह आहे. आम्ही महामंडळाची मागणी केली आहे. या बैठकीत जिल्हापरिषद, महापालिका यासंदर्भात चर्चा झाल्याचे आठवले म्हणाले.

 

RPI ला डावलून चालणार नाही. आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. माझी पाऊण तास चर्चा झाली. मी केंद्रात मत्री असल्याने इतर राज्यात देखील पक्षाच्या जागा वाढवतो.

 

महायुतीत जागा मिळाल्या पाहिजेत. मला वाईट वाटतंय. आम्ही सातत्याने महायुती सोबत आहोत. तरीही आम्हाला जागावाटपात स्थान मिळत नाही. आम्हाला नांदेडमधील जागा हवी होती.

 

अनेक जागा हव्या होत्या. आम्ही 5-4 जागांची अपेक्षा ठेवली होती, असे आठवले म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना पात्र लिहिले आहे, त्यात आमच्या मागण्या आहेत. आम्हाला 1 एमएलसीदेखील हवी आहे, असे ते म्हणाले.

 

काँग्रेस पक्ष हा मजबूत करण्यापेक्षा तुम्हाला खीळखीळा करतो असे यावेळी आठवले म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी महायुतीकडे परत यावं.

 

उद्धव ठाकरे हे महायुती सोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे फुटले नसते. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट निवडणुकीनंतर होऊ शकते, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

 

महायुतीत रामदास आठवले दिसतात पण त्यामध्ये आरपीआयच्या जागा दिसत नाही. याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आम्ही 21 जागांची मागणी केली आहे.

 

पण चर्चेत आम्हाला कधी बोलावले नाही. सध्याच्या घडीला 8-10 जागा मागितल्या होत्या पण मिळतील असं वाटत नाही. 5 जागा मिळतील अशी आमची मागणी आहे.

 

अन्यथा आम्हाला एमएलसी, महामंडळ मिळायला हवे. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. आपल्याला किती जागा मिळाल्या? असे मला रोज फोन येतात, असेही आठवलेंनी यांनी सांगितले.

 

 

बाळासाहेबांच्या आवाहनानंतर शिवशक्ती-भिमशक्तीसाठी मी सगळीकडे फिरलो. त्याआधी माझी भाजप विरोधी भूमिका होती.2012 च्या बीएमसी निवडणूकीत आरपीआय आल्यानंतर महायुती तयार झाली.

 

आता दोन मोठे पक्ष आल्याने आरपीआय कुठे दिसत नाही. आरपीआयला दुर्लक्षित करणे चांगल होणार नाही. त्या पत्रकार परिषदेत मला बोलायला दिले नाही. विश्वासात घेतले जात नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

 

असं असतानाही रामदास आठवले युतीसोबत का आहेत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते म्हणाले, ‘मला मोदींनी मंत्रिपद दिलंय हे याचे उत्तर नाही.

 

तर नागालॅण्डमध्ये आमचे 2 खासदार आहे. मणिपूरमध्ये माझ्या उमेदवाराला १७ टक्के बहुमत होते. अनेक राज्यांमध्ये आरपीआयच्या शाखा आहेत.

 

मी मंत्री असल्यामुळे संपूर्ण देशात फिरण्याची मला संधी मिळते. अन्याय होतोय पण लगेच निर्णय घेणे माझ्यासाठी थोडं अडचणीचं आहे,

 

असे उत्तर त्यांनी दिले. सर्व माझ्यासोबत असल्याने मी उलट भूमिका घेत नाही. आम्ही इतका त्याग करतो तर 3 ते 4 जागा द्यायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

दरम्यान, रामदास आठवले यांनी आज उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते. त्याकरता ते वर्षा बंगल्याच्या शेजारच्या बंगल्यावर त्यांच्या बोलावण्याची वाट पाहत होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *