निवडणूक प्रचार सुरु होताच ;भाजपचे मुस्लिम आगपाखड ;जरांगेचेही सडेतोड उत्तर

As soon as the election campaign started; BJP's Muslim firebomb; Jarange's reply too

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा-मुस्लिम आणि दलित यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय.

 

दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे, मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमाणी आणि आनंदराज आंबेडकर एकत्रित आले होते. दरम्यान मनोज जरांगे रविवारी (दि.3) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणार आहेत.

 

यापूर्वी मनोज जरांगे यांच्याकडून अनेक मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांनी बैठक घेऊन एकच उमेदवार ठरवावा,

 

अशा सूचना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी यांना जवळ केल्यानंतर

 

भाजपच्या काही प्रवक्त्यांनी आणि समर्थकांनी मनोज जरांगे मुस्लिम धार्जिणे आहेत, अशी टीका केली होती. यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

मनोज जरांगे म्हणाले, मला मुस्लिम धार्जिणे म्हणणारे स्वत: मुस्लिम धार्जिणे नाहीत का? ट्रोल करणारे आणि त्यांचे बाप ते मु्स्लिम धार्जिणे नाहीत का? मोदी साहेब नवाब शरिफच्या मुलीच्या लग्नाला कशाला गेले होते पाकिस्तानला?

 

बांगल्यादेशच्या पंतप्रधान पळून भारतात आल्या. त्यांना मोदी साहेबांनी सांभाळलं. त्यांची आत्या होती का? ते मुस्लिम धार्जिणे नाहीत का? पाशा पटेल कोण आहे? ते मुसलमान यांना चालतात.

 

आम्ही मुस्लिमांना भेटलो की मला जातीवाद म्हणतात. नवाब मलिक, हसन मुश्रीफ कोण आहेत. तुम्ही दर्ग्यात जातात. त्यावेळी तुम्हाला चालतं. आम्ही गेलो की, चालत नाही. तुम्हालाच हिंदूत्व कळतं का? आम्ही कट्टर हिंदू आहोत. आम्ही छत्रपतींचं हिंदूत्व मानतो.

 

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, भाजपला मराठ्यांना मोठं केलं आहे. संविधान आणि कायदा सांगतो , माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी यांना सांगितलं असेल ट्रोल करा.

 

आम्ही हिंदू आहेत. तुम्हाला आम्ही फक्त मुस्लिमांबरोबर भांडण खेळायला लागतो. आता हिंदूंचे मुलं मराठ्यांचे मुलं धोक्यात आहेत. सगळ्या हिंदूंनी म्हणावे की, मराठ्यांना आरक्षण द्या. हिंदू का विरोध करतोय?

 

छगन भुजबळ हिंदू नाही का? बाकीचे मराठा आरक्षणाला विरोध करणारे हिंदू नाहीत का? हिंदूमधील मराठ्यांची जात धोक्यात आहे. आता सर्व हिंदूंनी म्हणावे की, मराठ्यांना आरक्षण द्या.

 

भांडण करायच्या वेळेस आम्ही लागतो. आम्ही मुस्लिमांना शत्रू मानत बसतो. ते आम्हाला पाणी वाटतात. आमचेच हिंदू आमच्या

 

विरोधात मोर्चे काढतात. आरक्षण देऊ नका म्हणतात, हे कोणतं हिंदूत्व आहे? असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *