आघाडी-महायुतीत कुठे बंड आणि कुठे माघार;पाहा राज्यभरातील चित्र

Where to rebel and where to retreat in Aghadi-Grand Alliance; see the picture across the state

 

 

 

 

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवासानंतर माघार घेण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी शिल्लक होता.

 

महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी बंडखोरी थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांनी प्रयत्न करून देखील

 

राज्यातील अनेक मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. जाणून घ्या राज्यातील कोणत्या मतदारसंघात बंडखोरी झाली आणि कुठे माघार घेण्यात आली.

 

 

राज्यातील बंडखोरी झालेले मतदारसंघ आणि उमेदवार

तुमसर- मधुकर कुकडे (राष्ट्रवादी शरद पवार)
पाथरी- बाबाजानी दुर्राणी (राष्ट्रवादी शरद पवार)

 

जालना- भास्कर दानवे (भाजप)
चांदवाड- केदा अहेर (भाजप)

 

इगतपूरी- निर्मला गावित (शिवसेना ठाकरे)
ऐरोली- विजय चौघुले(शिवसेना शिंदे)

 

बेलापूर- विजय नहाटा (शिवसेना शिंदे)
वर्सोवा- राजू पेडणेकर (शिवसेना ठाकरे)

 

भायखळा- मधू चव्हाण (काँग्रेस)
जुन्नर- शरद सोनवणे(शिवसेना शिंदे)

 

मावळ- बापू भेगडे (भाजप)
पर्वती- आबा बागूल(काँग्रेस)

 

कसबा पेठ- कमल व्यवहारे(काँग्रेस)
अकोले- वैभव पिचड (भाजप)

 

शिर्डी- राजेंद्र पिपाडा (भाजप)
श्रीगोंदा- राहुल जगताप (राष्ट्रवादी शरद पवार)

 

गेवराई- लक्ष्मण पवार (भाजप)
बीड- ज्योती मेटे (राष्ट्रवादी शरद पवार)

 

आष्टी- बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी अजित पवार)
माजलगाव- रमेश आडस्कर(राष्ट्रवादी शरद पवार)

 

केज- संगीता ठोंबरे (भाजप)
माढा- रणजीत शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार)

सोलापूर दक्षिण- धर्मराज काडादी (राष्ट्रवादी शरद पवार)
अक्कलकुवा-हीना गावित (भाजप)

 

सिंदखेडा- श्याम सनेर (काँग्रेस)
अमळनेर- शिरीष चौधरी(भाजप)

 

अमळनेर- अशोक पवार(राष्ट्रवादी शरद पवार)
नांदगाव- समीर भुजबळ
(यादी अपडेट होत आहे)

 

 

दरम्यान बंडखोरी करणाऱ्यांपैकी काही उमेदवारांनी माघार देखील घेतली आहे. यात चिंडवडमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाना काटे, अंधेरी पूर्वमधून शिवेसनाचेया स्वीकृती शर्मा,

 

बोरिवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांनी माघार घेतली आहे. चिंचवडमधून नाना काटेंनी माघार घेतली असून त्यांनी शंकर जगतापांना पाठिंबा दिला आहे.

 

पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सचिन तावरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

परंतु वेळेमध्ये ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. ३ मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे त्यांचा अर्ज माघार होऊ शकला नाही, पण सचिन तावरे यांचा महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना पाठींबा आहे.

 

अशी माहिती राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अंकुश काकडे यांनी दिली आहे. नाशिक मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी बंडखोरी केली होती. मात्र आता त्यांनी माघार घेतली होती.

 

या सर्व घटनेत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मोठा ट्विस्ट समोर आला. कोल्हपूर काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनीच माघार घेतली आहे.

 

यामुळे येथे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. या मतदारसंघात महाविकास आघाडीला अपक्ष उमेदवार राजू लाटकर यांना पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.

 

विशेष म्हणजे लाटकर यांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला विरोध झाल्याने मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

 

बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज माघे घेतला आहे. पालघरमधून अमित घोडा यांनी माघार घेतल्याने राजेंद्र गावितांचा मार्ग सोपा झाला आहे.

 

माजी मंत्री मधुकर चव्हाण यांची निवडणुकीतून माघार काँग्रेसला बंडखोरी शमवण्यास यश आले आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अर्ज भरला होता.

 

निलंगा मतदारसंघातून अशोकराव पाटील निलंगेकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर राजू पारवे यांची उमेरडमधून माघार घेतली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *