AMIM उमेदवार इम्तियाज खान यांचा प्रचार सभेत हल्ल्याचा आरोप

AMIM candidate Imtiaz Khan accused of assault in campaign rally

 

 

 

 

8 नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरात AIMIM तर्फे प्रचार सभेत उमेदवार ऍड इम्तियाज खान यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे.

 

इम्तियाज खान यांच्या म्हणण्यानुसार ती अशी कि AIMIM च्या जाहीर सभेचे गंगाखेड नाका परिसरात आयोजन करण्यात आले होते

 

या प्रचार सभेसाठी रीतसर व कायदेशीर परवानगी घेण्यात आलेली होती, या प्रचार सभेसाठी पोलीस व निवडणूक आयोगाचे पदाधिकारी ही उपस्थित होते

 

सभेला सुरुवातीपासूनच मोठी गर्दी जमा झालेली होती. AIMIM पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाषण झाल्यानंतर  शेवट AIMIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पक्षाचे उमेदवार ॲड इम्तियाज खान यांचे  भाषण सुरू  असताना

 

त्या भागातील लाईट बंद पडली व काही समाजकंटक स्टेजवर धावून आले व ॲड इम्तियाज खान यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप इम्तियाज खान यांनी केला आहे.

एडवोकेट इम्तियाज खान यांच्या म्हणण्यानुसार त्यांना निवडणूक सुरू झाल्यापासून माघार घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे ,धमक्याही देण्यात येत आहेत ,

 

जीव गेला तरी चालेल पण माघार घेणार नाही लढा देणारच आणि जिंकून येणारच ही लोकशाही आहे मला हे अधिकार लोकशाहीने दिलेला आहे

 

मी कोणालाही घाबरणार नाही. समाजासाठी मी जीव द्यायलाही तयार असल्याची प्रतिक्रिया इम्तियाज खान यांनी  खरा दर्पण शी बोलताना दिली

 

या प्रकरणात पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *