शिंदे सरकारचे दोन मंत्री आणि आठ जणांना परत यायचं होतं, आदित्य ठाकरेंनी सांगितलं ‘मातोश्री’वर काय घडलं

Two ministers of Shinde government and eight people wanted to return, Aditya Thackeray told what happened on 'Matoshree'

 

 

 

नारायण राणे यांना ओळखण्यात आमचा पक्ष (शिवसेना) व वरिष्ठांची चूक झाली. तशीच चूक या ४० गद्दारांच्या (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षातील लोक) बाबतीतही घडली.

 

आजच्या घडीला तिकडचे (शिंदेंची शिवसेना) काहीजण परत येऊ इच्छितात. परंतु, आम्ही त्यांना परत येण्याचा विचार सोडून द्या असं स्पष्टपणे सांगितलं आहे”,

 

असं वक्तव्य शिवसेनेचे (ठाकरे) आमदार व वरळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते म्हणाले,

 

“या विधानसभा निवडणूक काळात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तिकडच्या काही लोकांनी शिवसेनेत (ठाकरे) परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आम्ही त्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला”.

आदित्य ठाकरे  मुलाखतीत म्हणाले, “गेल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना एकनाथ शिंदे यांच्या गटातील आठ जणांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

या आठ जणांमध्ये दोन वरिष्ठ मंत्री देखील होते. त्यांना परत यायचं होतं. त्यांना आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवायची होती. ते आम्हाला म्हणाले, तुम्ही साहेबांना (उद्धव ठाकरे) विचारा,

 

आम्ही इथे बंडाची घोषणा करतो, मोठं बंड करू, मग माफी मागू आणि त्यानंतर पक्षात परत येऊ, अशी त्यांनी योजना बनवली होती. मात्र, आम्ही त्यांना नकार कळवला”.

 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आमच्यात होतात, आमच्याबरोबर असताना आमच्यासाठी ठीक होतात, आता तुम्ही त्यांच्याबरोबर गेलेले आहात, आम्ही तुमचं चारित्र्य पाहिलं आहे.

 

तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार करत आहात, तिथे आम्ही जिंकू किंवा हरू, आम्हाला त्याची पर्वा नाही.

 

परंतु, आम्ही तुम्हाला परत घेऊ शकत नाही. भले आम्ही त्या मतदारसंघांमध्ये पराभूत झालो तरी चालेल, तरी आम्ही तुम्हाला परत घेणार नाही”.

 

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “मला या लोकांबद्दल, नारायण राणे, मनसे किंवा या गद्दारांबद्दल बोलण्यात फार रस वाटत नाही. हा वेळेचा दुरुपयोग वाटतो.

 

मला त्यांच्याशी वाद घालायला देखील आवडत नाही. आपल्या देशात राजकारण्यांचा सर्वाधिक वेळ कुठे जात असेल तर तो एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे, टीकाटिप्पणी करण्यात जातो. मला त्यात पडायचं नाही. माझ्या मनात कोणाबद्दलही चिड नाही”.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *