महायुतीत अचानक घडामोडी,अमित शहांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे,फडणवीस,अजितदादांसोबत तातडीची बैठक
Sudden developments in the Grand Alliance, Amit Shah held an urgent meeting with Chief Minister Shinde, Fadnavis, Ajit Dada
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले.
या संकल्प पत्रात पुढील पाच वर्षेंमध्ये काय काय योजनाराबवणार याबाबत आश्वासन देण्यात आलं आहे. दरम्यान या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे,
ती म्हणजे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड एक बैठक झाली आहे. चौघांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
प्रचाराच्या धामधुमीमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बंददाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.
या चार नेत्यांमध्ये जवळपास दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये अमित शाहांकडून महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेण्यात आला.
विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या, शेवटच्या टप्प्यात प्रचारावर भर द्या, अशा सूचना अमित शाहांकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन करण्यात आलं आहे. या संकल्पपत्रामध्ये पक्षाकडून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.
लाडक्या बहिणींना 1500 रुपयांनाऐवजी 2100 रुपये देणार, शेतकऱ्यांना कर्ज माफी, अंगणवाडी सेविकांच्या माणधनात वाढ, महिलांना आर्थिक साक्षर करू, महिलांना उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार,
महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात 25 हजार महिला पोलिसांची भरती करणार अशा विविध घोषणा भाजपकडून आपल्या संकल्पपत्रात करण्यात आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये अमित शाह यांनी विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या, शेवटच्या टप्प्यात प्रचारावर भर द्या, अशा सूचना केल्याची माहिती समोर येत आहे