एक वर अन् चार वधू… अनोख्या लग्नाचा पाहा ;VIDEO
One groom and four brides... Watch the unique wedding video

लग्न हे दोन व्यक्तींमधील पवित्र नाते आहे. लग्नबंधनात अडकलेल्या दोन व्यक्ती त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,
हा व्हिडिओ एका लग्नाचा आहे. पण हे इतर लग्नांपेक्षा खूप वेगळे आहे. कारण यात एक वर पण चार नववधू आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक खूप आश्चर्य व्यक्त करत आहेत.
व्हिडिओमध्ये पांढरा कोट आणि पँट घातलेला वर समोर आहे. लग्नातील फेऱ्यांचे विधी होत आहेत. त्याच्या मागे चार नववधू आहेत. मध्यभागी होम पेटवलेला आहे.
आजूबाजूचे लोक त्यांच्यावर फुले फेकत आहेत. समोर एक पंडितही दिसत आहेत. फेरे पूर्ण झाल्यानंतर, सर्व वधू नतमस्तक होतात आणि वराच्या चरणांना स्पर्श करतात.
या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे, याबाबत काहीही सांगता येणार नाही. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबतही काही माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @musafir_vj नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर लोक मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत.
एका सोशल मिडीया यूजरने लिहिले की, ‘हे फेक आहे, हे घरात केलेलं नाटक आहे, असं कोणी करेल का?’ दुसऱ्या सोशल मिडीया युजरने म्हटले की, ‘ राज्यघटना याला परवानगी देत नाही. असे केल्याने शिक्षा होते’.
आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘हे खोटे आहे. फक्त रील आहे, दुसरे काही नाही. आतापर्यंत 73 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत.
सारथी मेरे रथ को खाई के तरफ ले चलो…???? pic.twitter.com/n9bYlCOtMS
— मुसाफिर ????vk (@musafir_vj) December 7, 2023