सरकार स्थापन होण्यापूर्वीच मराठवाड्यातील भाजप नेत्याचा मंत्रिपदावर दावा

BJP leader from Marathwada claims ministerial berth even before government is formed

 

 

 

“मी मराठवाड्यात सर्वात सिनियर आमदार आहे. 40 वर्षांपासून मी भाजपमधला निष्ठावंत कार्यकर्ता आहे. 40 वर्षात शंभर रुपयाचा मी अपहार केला नाही. चाळीस वर्ष निष्कलंक राहणं साधीसुधी गोष्ट नाही.

 

मला मंत्रि‍पदाची संधी मिळावी”, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. ते जालना येथे बोलत होते.

 

जालन्यातील परतूर येथे भाजप कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे.

बनराव लोणीकर म्हणाले, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नेतृत्वातील सरकार भ्रष्टाचारात तुडुंब बुडालेलं आणि बरबटलेलं होतं. साधुसंतांना रस्त्यात तुडवलं जात होतं,मारले जात होतं.

 

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत होतं. माझ्यावर ही गुन्हा दाखल करून देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. उद्धव ठाकरेंचे सरकार उद्धट होतं त्यांची रिक्षा मागे जात नव्हती आणि पुढेही जात नव्हती..

 

यावेळी एकनाथ शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. देवेंद्रजी च्या रूपाने आपलं माहायुतीच सरकार येत आहे. यावेळी मंत्री पदाची संधी मला मिळावी, असं मी देवेंद्र फडणवीस यांना म्हणालो आहे.

 

मी पाचव्यांदा आमदार मराठवाड्यात सध्या कोणी नाही. मी सर्वात सीनियर आहे, 40 वर्ष मी भाजप मधला निष्ठावंत कार्यकर्ता आहे.

 

40 वर्षात शंभर रुपयाचा मी अपहार केला नाही. चाळीस वर्ष निष्कलंक राहणं साधीसुधी गोष्ट नाही, असंही बबणराव लोणीकर यांनी नमूद केलं.

 

पुढे बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले, महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता व्यथित झाला होता. शेवटी राज्य समोर संकट होतं. उद्धव ठाकरेंचं सरकार भ्रष्ट होतं.

 

गृहमंत्रीचं पैसे वसूल करत होते. अन्याय अत्याचार होतं होते. साधू संतांना रस्त्यामध्ये मारलं जातं होतं. माझ्यावरही एक खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंनी सुडाचं राजकारण केलं. विकासाच्या नावाने बोंबाबोंब होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *