परभणीत संविधानाच्या प्रतीची विटंबना, दगडफेक;एसटी बससेवा बंद ,संतप्त जमावाकडून रेल्वे रोखली

Desecration of the Constitution, stone pelting in Parbhani; ST bus service closed, railway blocked by angry mob

 

 

 

आज सायंकाळी ४. ३० वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातील रेल्वेस्थानक रोड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

यांच्या पुतळा परिसरात ठेवण्यात आलेली संविधानाच्या प्रतिची समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आल्यामुळे परभणी शहरात तणाव निर्माण झाला असून ,

 

सायंकाळी बाजारपेठ बंद करण्यात आली , घडलेल्या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त झाले. शरीरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमा झाले.

 

प्रचंड घोषणाबाजी झाली , उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली , संतप्त जमावाकडून परभणीच्या रेल्वे स्थानकात जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस रोखण्यात आली

 

संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला पोलिसांनी अटक केली आहे.परभणी शहराकडे येणाऱ्या एसटी बसेस बाहेरच थांबविण्यात आल्या असून परभणी बसस्थानकातून एसटी बसेस ची सेवा बंद करण्यात आलेली आहे,

 

दक्षता म्हणून बसस्थानकावरील सर्व एसटी बसेस डेपोमध्ये लावण्यात आल्या आहेत. अचानक बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवाश्याना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

विटंबना झाल्याची बातमी परभणी शहरात वाऱ्यासारखी पसरली. हजारो आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दाखल झाले.

 

तसेच पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तेथे तैनात करण्यात आला. पण संतप्त झालेल्या आंबेडकरी तरुणांनी तिथे असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली, रास्ता रोको आंदोलन केले.

 

परभणी रेल्वे स्थानकावर जाऊन मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस तब्बल अर्धा तास रोखून ठेवली. पोलिसांनी तात्काळ रेल्वेस्थानकात पोहोचून

 

नंदिग्राम एक्सप्रेस परभणी स्थानकातून रवाना केली .या प्रकरणातील समाजकंटक आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन परभणी पोलिसांनी आंदोलकांना दिले आहे.परभणी शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून संपूर्ण शहर कडकडीत बंद आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *