मोदींचा मध्य प्रदेश,राजस्थान मध्ये महाराष्ट्र पॅटर्न
Modi's Maharashtra pattern in Madhya Pradesh, Rajasthan
राजस्थानच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची घोषणा भाजपकडून मंगळवारी केली. पण यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये एक कॉमन पॅटर्न दिसून आला आहे. तो म्हणजे दोन उपमुख्यमंत्री! म्हणजेच राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.
दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे राजस्थानचे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर यंदा पहिल्यांदाच निवडून आलेले सांगानेर मतदार संघाचे आमदार भजनलाल शर्मा हे मुख्यमंत्री असणार आहेत.
यंदाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली होती. कारण लोकसभेपूर्वीची ही सेमीफायनलच मानली गेली. या पाच राज्यांपैकी तेलंगाणा आणि मिझोरामध्ये भाजपची ताकद कमी आहे.
पण उर्वरित राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी हार्टलँड मध्ये भाजप स्वबळावर सत्ता आणू शकते आणि तशी त्यांनी आणली देखील.
पण या तीन राज्यांसाठी भाजपनं आपली पारंपारिक राजकीय स्ट्रॅटेजी बाजूला सारून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नव्हता. त्यानंतर आता संभाव्य नावांना बाजुला सारुन नवे चेहरे मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करुन धक्कातंत्र वापरलं आहे.
त्याचबरोबर एक वेगळा पॅटर्नही यातून दिसून आला आहे तो म्हणजे दोन उपमुख्यमंत्र्यांची घोषणा. बरं हे दोनच का? तर त्यामागं अशी रणनिती असल्याचं सांगितलं जात आहे की,
उपमुख्यमंत्रीपद मिळालेले चेहरे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण अँटिइन्कम्बन्सी आणि बदल दिसावा यासाठी मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे देण्यात आले, पण या शर्यतील इतरांना मुख्यमंत्रीपदाच्या खालोखाल उपमंत्रीपद देण्यात आली आहेत.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडामुळं महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपनं शिंदेंच्या मदतीनं सरकारनं स्थापन केलं.
पण या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस नव्हे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आणि फडणवीसांनाउपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं.
त्याचबरोबर नंतर राष्ट्रवादीतीतून अजित पवार बाहेर पडल्यानंतर ते देखील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानं त्यांनाही उपमुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आलं.
नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेशच्या निवडणुकीनंतर तिथेही दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले. यांपैकी एक राजेंद्र शुक्ला आणि दुसरे दगदीश देवडा उपमुख्यमंत्री बनले आहेत.
Two Deputy CMs named for Rajasthan — Diya Kumari & Premchand Bairwa. pic.twitter.com/q2MrHbkyrE
— Shiv Aroor (@ShivAroor) December 12, 2023