ज्या खासदाराच्या पासवर लोकसभेत घुसखोरी झाली ते खासदार कोण ? जाणून घ्या सविस्तर
Who is the MP on whose pass the Lok Sabha was intruded? Know in detail

संसदेची कडक सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेचं कामकाज सुरु असताना भर सभागृहात गॅलरीतून उडी घेत दोन तरुणांकडून स्मोक क्रॅकर उडवण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
या दोघांसह संसद भवनाच्या बाहेरुन दोघांना अशा एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची आता कसून चौकशी सुरु आहे.
अद्याप ते कोण आहेत? कोणत्या हेतून त्यांनी हे कृत्य केलं? हे कळू शकलेलं नाही. पण त्यांना संसदेत एन्ट्रीसाठी एका खासदाराच्या शिफारशीनं पास उपलब्ध करुन दिले तो खासदार कोण आहे? जाणून घेऊया.
खासदार प्रताप सिम्हा यांच्या शिफारशीनं संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना पास मिळाले होते. हे खासदार प्रताप सिम्हा कर्नाटकातील म्हैसूरचे खासदार आहेत. त्यांचं वय ४२ वर्षे असून ते भाजपचे खासदार आहेत.
प्रताप सिम्हा यापूर्वी पत्रकार होते. त्यांनी कन्नड भाषेतील विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. प्रताप सिम्हा हे कट्टर हिंदुत्ववादी राजकारणासाठी ओळखले जातात. ते कर्नाटकातील भारतीय जनता युवा मोर्चाचे अर्थात भाजयुमोचे अध्यक्ष आहेत.
प्रताप सिम्हा यांचा जन्म कर्नाटकमधील सुंदर हिलस्टेशन सकलेशपूर इथं झाला. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात विजया कर्नाटक या वर्तमानपत्राच्या पत्रकाराच्या रुपानं झाली.
हे वर्तमानपत्र कर्नाटकातील एक दैनिक आहे.त्यानंतर ‘बेट्टाले जगत्तू’ (नग्न जग) नावाच्या स्तंभलेखनामुळं चर्चेत राहिले. त्यांचा हे लेखन जगातील विविध घडामोडींविरोधात टीकात्मक असं होतं.
त्यानंतर पुढे त्यांनी २००८ मध्ये पंतप्रधान मोदींचं आत्मचरित्र लिहिलं, ज्याच नाव त्यानं ‘नरेंद्र मोदी : यारु थुलियादा हादी’
सन २०१४ मध्ये राजकारणात एन्ट्री घेतली त्यानंतर ते लगेचच भाजयुमोचे अध्यक्ष बनले. त्यांनी २०१४ मध्ये म्हैसूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला ३२००० मतांनी पराभूत केलं. त्याचबरोबर प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे ते सदस्य देखील होते.