अमेरिकेत ‘नोरोव्हायरस नावाच्या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक

Outbreak of infectious disease called norovirus in the US

 

 

 

अमेरिकेमध्ये नोरोव्हायरस संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. नोरोव्हायरस हा पोटातील जंत आहे. 5 डिसेंबरच्या आठवड्यामध्ये नोरोव्हायरसची तब्बल 91 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

 

जी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा जास्त आहे. नोरोव्हायरस प्रकरणांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य अधिकारी सर्तक झाले असून ते व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या प्रतिबंधात्मक उपयांच्या महत्त्वावर लक्ष देत आहेत.

 

नोराव्हायरस हा एक संसर्गजन्य विषाणू आहे ज्यामुळे रुग्णाला उलटी किंवा अतिसार होतो. नोरोव्हायरसला नॉरवॉक व्हायरस, स्टमक बग, स्टमक फ्लू, किंवा व्होमॅटिक बग ही म्हटले जाते.

 

अमेरिकेतील युएस फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, हा व्हायरस अमेरिकेमध्ये अन्राच्या माध्यमातून पसरणारा प्रमुख आजार आहे. या विषाणूमुळे पोट किंवा आतड्यांमध्ये जळजळ होते.

 

ज्या व्यक्तींना या नोरोव्हायरसची लागण होते ते हा व्हायरस दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहचवतात. दूषित अन्र, पाणी, पृष्ठभाग आणि संक्रमित व्यक्तींच्या जवळच्या संपर्कातून पसरतो

 

तसेच अन्र अथवा जेवणाची भांडी सामायिक करण्यामुळेही पसरतो. या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

नोरोव्हायरसची लागण झालेला रुग्ण हा एक ते तीन दिवसामध्ये ठीक होतो. मात्र बरा झालेल्या रुग्णांकडून इतर लोकांना धोका निर्माण होऊ शकतो कारण बरा झालेला रुग्ण हा काही दिवस इतर लोकांपर्यंत विषाणूचा संसर्ग पोहचवू शकतो.

 

सीडीसीचे म्हणणे आहे की, कोणत्याही व्यक्तीला नोरोव्हायरसचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे या व्हायरसचा धोका सर्व वयोगटातील लोकांना आहे.

सीडीसीच्या नुसार, नोरोव्हायरसची ज्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे. त्या व्यक्तीला 12 ते 48 तासांमध्ये आजाराची लक्षणे दिसू लागतात. त्यामध्ये उलटी,

 

अतिसार, पोटात मळमळ, पोटदुखी ही प्रमुख लक्षणे असून इतर लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी यांचा समावेश होतो.

 

प्रतिबंधात्मक उपाय
हात वारंवार आणि स्वच्छ धुवा.
फळे, भाज्या धुणे.
दूषित पृष्ठभाग स्वच्छ करणे आणि निर्जंतुकीकरण करणे
कपडे धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणे.
संक्रमण झालेल्या रुग्णांनी घरी विश्रांती घेणे आवश्यक आहे. नोरोव्हायरसचे रुग्ण हे एक ते तीन दिवसांमध्ये बरे होतात. या व्हायरसच्या उपचारकरिता कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *