वीजग्राहकांना ‘जोर का झटका’!लवकरच वीज दर वाढणार

Electricity consumers in for a 'big shock'! Electricity rates will increase soon

 

 

मुंबईसह राज्यातील वीज कंपन्यांनी नव्या दरांची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना वितरण करणाऱ्या दोन कंपन्यांचे प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर झाले आहेत.

 

तर दोन कंपन्या लवकरच असा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती आहे. हे नवे दर १ एप्रिल २०२५ पासून लागू होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ग्राहकांना दरवाढीची झळ सोसावी लागणार की नाही, याबाबत लवकरच स्पष्टता अपेक्षित आहे.

वीज क्षेत्रातील सर्व कंपन्यांची प्रत्येकी पाच वर्षांनी दरनिश्चिती होते. त्याला ‘मल्टी ईयर टेरिफ’ (एमवायटी) संबोधले जाते. हे पाचवे वर्ष संपत आले की,

 

कंपन्या त्यांच्या वीजनिर्मिती किंवा वीज पारेषण किंवा वितरण खर्चानुसार आवश्यक असलेली महसुली गरज व ती गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले दर यांची याचिका प्रस्ताव रुपात आयोगाकडे सादर करतात.

 

त्या याचिकेवर आयोगाकडून जनसुनावणी घेऊन व त्यानंतर आवश्यक तितक्याच महसुली गरजेनुरूप दर निश्चित होतात. याआधीची अशी दरनिश्चिती १ एप्रिल २०२० ला झाली.

 

त्याचा पाच वर्षांचा कालावधी आता ३१ मार्चला २०२५ ला संपणार आहे. यामुळेच वीज क्षेत्रातील कंपन्यांकडून नव्या दरांचे प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात झाली आहे.

ग्राहकांना थेट वीज देणाऱ्या राज्यातील वीजवितरण कंपन्यांचा विचार केल्यास, त्यामध्ये मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी, बेस्ट व टाटा पॉवर या कंपन्यांकडून वितरण होते. तर मुंबई महापालिका हद्दीतील

 

भांडुपपासून पुढे संपूर्ण महामुंबई व राज्यभर महावितरण ही सरकारी कंपनी ग्राहकांना वीज देते. त्यामुळे त्यांच्या दरांकडेही ग्राहकांंचे विशेष लक्ष असेल.

मुंबईत सर्वाधिक ३१.५० लाख ग्राहकांना वीज देणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी व प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील साडे दहा लाख ग्राहकांना वीज देणाऱ्या बेस्ट उपक्रमकडून नव्या दरांचा प्रस्ताव आयोगाकडे सादर झाला आहे.

 

तर प्रामुख्याने दक्षिण, मध्य व पूर्व मुंबईतील साडे सात लाख ग्राहकांना वीज वितरण करणाऱ्या टाटा पॉवरकडून लवकरच असा प्रस्ताव सादर होणार आहे.

 

राज्यभरात २.७५ कोटी ग्राहक असलेल्या महावितरणची प्रस्ताव सादर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *