संतोष देशमुख हत्याकांड ;संतप्त महिलांनी पोलिस अधीक्षकांच्या अंगावर बांगड्या फेकल्या.

Santosh Deshmukh murder case; Angry women threw bangles at the Superintendent of Police.

 

 

 

मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर राज्यात अनेक ठिकाणी आक्रोश मोर्चे झाले. आज मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.

 

आरोपींना फाशी द्या आणि इतर मागण्यांसाठी दोन तास पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले. यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक आणि

 

मनोज जरांगे पाटील त्यांना विनंती करून खाली उतरवले. यावेळी काही महिलांनी पोलिस अधीक्षकांच्या अंगावर बांगड्या देखील फेकल्या.

आता दोन तासांनी पाण्याच्या टाकीवरून खाली आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलीये. धनंजय देशमुख म्हणाले की, कशासाठी न्याय मागू मी?. न्याय मागता त्या माणसावर त्यांनी प्रत्येक तालुक्यात एनजी दाखल केल्या.

 

अन्याय झालेल्या माणसांना आंदोलन करावे लागते, हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखे आहे. परवा दिवशी वैभवीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि आम्हाला तसापाची माहिती द्या, असे म्हटले.

 

त्यानंतर मी त्याच्यावर बोललो आणि त्यानंतर सर्वजण अलर्ट झाले आणि इथे आले. चेतना तिकडे मॅडम माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला म्हटले होते की, अंत्यविधी करून घ्या विटंबना होईल.

 

त्यानंतर मी त्यांना फोन दिला आणि म्हटले की, विष्णू चाटेचा फोन सुरू आहे, आमच्यासमोर बोला आणि तो कुठे आहे ते बघा आणि त्याला पकडा. आता त्याच्यानंतर त्यांची आणि माझी टाकीवर 35 दिवसांनी भेट झालीये.

 

माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि मी सर्व ऑफिसमध्ये जाऊन तपास कुठंपर्यंत झाला हे विचारले पाहिजे का?. मी तुमच्या सर्वांसमोर सांगतो की, माझ्या भावाला न्याय मिळूपर्यंत मी अजिबात मागे हटणार नाही.

 

आमचा दोष काय?. आम्ही न्याय कशासाठी मागतो. आमच्या दोघांवर कोणत्याही प्रकारची केस नाही आणि आम्ही पण आयुष्यात कोणावर केली नाही, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

 

धनंजय देशमुख पुढे म्हणाले की, न्यायासाठी मला जे काही करता येईल ते सर्व मी करेल. मला फक्त न्याय पाहिजे आहे. सर्व कुटुंबाचा जीव त्याच्यामध्ये होता तो माझा भाऊ आज नाहीये

 

याप्रकरणी अद्यापही सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने मस्साजोग येथील ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबाने तीव्र संताप व्यक्त करत थेट सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

 

तर, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा तसेच, आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्यामुळे सध्या मस्साजोग येथे तणावाची स्थिती आहे. त्यासाठी पोलिसांचाही मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे.

 

मस्साजोग येथे आंदोलनाला सुरुवात झाली असून पाण्याच्या टाकीवर गावातील काही लोक टाकीवर चढून त्यांनी आंदोलन सुरू केलं. यामध्ये धनंजय देशमुखही होते. पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख आंदोलन करताना दिसले.

धनंजय देशमुख हे आज सकाळपासून कुठे होते कोणालाच माहिती नव्हतं. सकाळपासून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. ते कुठे गेले, कोणाला माहित नव्हतं. त्यामुळे ते आंदोलनात येणार की नाही हेही कळत नव्हतं. पण, दुपारी पावणेबारा वाजताच्या सुमारास ते गावातील पाण्याच्या टाकीवर चढलेले दिसले.

 

गावकऱ्यांनी आणि धनंजय देशमुखांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटीलही आज मस्साजोग येथे पोहोचले. धनंजय देशमुख यांना टाकीवर चढलेलं पाहून जरांगे यांनी हात जोडून त्यांना खाली येण्याची विनंती केली. जरांगे यांनी फोनवरुन धनंजय यांच्याशी संपर्क साधला.

 

जरांने धनंजय देशमुख यांना म्हणाले की, तुम्हाला काही झालं, तर मी यांचं जीण मुश्किल करेन. तुम्ही खाली या, तुमच्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे. सगळा समाज तुमच्या पाठिशी आहे,

 

आपल्याला संतोष भय्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. तुमच्या कुटुंबाला काही झालं तर मी यांचं जीण मुश्किल करेन, आत्महत्या करायची नाही, खाली या. जरांगे यांच्यासोबत बोलत असताना धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. तर जरांगे यांच्याही डोळ्यात पाणी तरळलं होतं.

 

पोलीस प्रशासन देखील पाण्याच्या टाकी वरती पोहोचला आहे आणि ज्या महिला अधिकारी आहेत. त्या तिथे दाखल झाले आहेत आणि पाण्याच्या टाकीवरती जाऊन त्या विनंती करत आहेत की आपण खाली या. तर, ग्रामस्थांकडून सतत घोषणाबाजी केली जात आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *