रेल्वे तिकीटांच्या रिझर्वेशन पद्धतीत बदल ;आता सर्वांना कन्फर्म तिकीट मिळणार !

Changes in the reservation system for railway tickets; now everyone will get a confirmed ticket!

 

 

 

भारतीय रेल्वेने दररोज अडीच कोटीहून अधिक लोक प्रवास करीत असतात. भारतीय रेल्वेला भारताची लाईफलाईन म्हटले जाते. सणासुदीत मेल आणि एक्सप्रेसला मोठी गर्दी होत असते.

 

त्यामुळे अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळताना मारामार होते. युपी आणि बिहार या उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रेन बारमाही गर्दी असते.त्यामुळे रेल्वेचे तिकीट मिळणे कठीण झाले आहे.

 

त्यामुळे आता भारतीय रेल्वे आपल्या नियमात एक बदल करणार आहे.आता सर्व प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा टांगता जीव राहणार नाही.

संसदेत रेल्वे संबंधी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्वाची माहीती दिली आहे. प्रवाशाच्या सोयीसाठी आता

 

आसनांच्या हिशेबाने तिकीट विकले जातील. म्हणजे जेवढे सीट असतील तेवढ्याच तिकीटांची विक्री केली जातील. त्यामुळे प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळणार आहे.

 

रेल्वेमध्ये तिकीटाशिवाय प्रवास करताना पकडले गेले तर तुम्हाला दंड भरावा लागेल. तुमच्याकडे पैसे नसतील किंवा तुम्ही दंड भरण्यास नकार दिला तर अशा परिस्थितीत प्रवाशाला आरपीएफच्या ताब्यात दिले जाते.

 

यासोबतच रेल्वे कायद्याच्या कलम १३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. आरपीएफ या प्रवाशांना कोर्टासमोर सादर करते. अशा परिस्थितीत त्यांच्यावर १००० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. हा दंड भरला नाही तर प्रवाशाला ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो.

 

रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की यासाठी अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत,

 

ज्यामध्ये लॉन्गर रेल, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, फॉग सेफ्टी डिव्हाइसेस आणि अनेक प्रमुख पावले उचलण्यात आली आहेत. आता भारतीय रेल्वे मोठा निर्यातदार बनली आहे.

 

ऑस्ट्रेलियाला मेट्रो कोच निर्यात केले जात आहेत, तसेच आपला देश युनायटेड किंग्डम, सौदी अरेबिया आणि फ्रान्सला रेल्वे कोच निर्यात करीत आहे. तसेच मेक्सिको, स्पेन, जर्मनी आणि इटलीला रेल्वे ऑपरेशनल उपकरणे निर्यात करीत असते.

 

अश्विनी वैष्णव म्हणाले की, लवकरच बिहारमध्ये तयार झालेले इंजिन्स ( लोकोमोटिव्ह ) आणि तामिळनाडूमध्ये बनवलेले रेल्वेची चाके जगभर धावतील.

 

भारतीय रेल्वेने या नियमाचे काटेकोरपणे पालन केले तर रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळणार आहे. अन्यथा रेल्वे तिकिटे मिळविण्यात अधिक अडचणी येऊ शकतात.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *