अजितदादांची बोगस स्वाक्षरी करून भामट्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
Bhamtya attempts to cheat Ajitdada by using fake signature
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वत:चं स्वाक्षरी करून एका व्यक्तीने देवगिरी बंगल्यावर विशेष कार्य अधिकारी निवड करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बनावट लेटर स्वाक्षरीने स्वत:ची देवगिरी बंगल्यावर विशेष कार्य अधिकारी निवड करून घेणाऱ्याला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे.
प्रवीण साठे (वय 42) असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा सातारा येथील आहे. सरकारी अधिकारी असल्याचे भासवून त्याने अनेकांकडून आर्थिक फायदा स्वीकारत फसवणूक केल्याचे तक्ररीत म्हटले आहे.
पुण्याचे व्यावसायिक तक्रारदार अतुल शितोळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण साठे याला मलबार हिल पोलिसांनी नवी मुंबईच्या उलवेतून अटक केली आहे.
त्याने अशा प्रकारे अन्य किती जणांची फसवणूक केली आहे याचा मलबार हिल पोलिस तपास करत आहेत. या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे बनावट लेटर हॅड व शिक्क्याचा वापर करून फसवणूकीचा प्रकार घडला होता.
त्या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा व स्वाक्षरीने आरोपींने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
आज पुण्यात पुन्हा पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्या राजनाम्याबाबत प्रश्न विचारला असता अजित दादा काहीसे भडकले असल्याचे बघायला मिळाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड प्रकणात चौकशी सुरू केली असून एसआयटी, सीआयडी चौकशी करत आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यावर कारवाई करण्यात येईल, असे ही सीएम म्हणताय.
यात सगळ्या चौकशी सुरु आहेत. किंबहुना बीड प्रकरणाचे कोणीही दोष असतील त्यांच्यावर कारवाई झाली आणि पुढेही होईल अशी प्रतिक्रिया देत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.