10 हजाराची लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक ;लाचलुचपत विभागाची कारवाई
Police inspector arrested while accepting bribe of 10 thousand; Bribery department action
सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतुकीचा व्यवसाय करू देण्यासाठी २१ हजाराची लाचेची मागणी करून दहा हजार रुपये रोख स्वीकारताना सारंगखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक
संदीप उत्तमराव पाटील व चालक पोलिस शिपाई गणेश भामट्या गावित या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पथकाने रंगेहाथ पकडले.शनिवारी ही घटना घडली.
सारंगखेडा (ता.शहादा) येथे श्री दत्त प्रभूंची यात्रोत्सव सुरू झाला आहे. या यात्रेत एका मद्य व्यावसायिकास दारू वाहतूक करण्यास परवानगी मिळावी म्हणून त्याने पोलिस निरीक्षकांशी संपर्क केला.
त्याबदल्यात त्याच्याकडे २१ हजाराची लाचेची मागणी पोलिस निरीक्षक संदीप पाटील व पोलिस शिपाई गणेश गावित यांनी केली. त्यानंतर दहा हजारात तडजोड झाली. याप्रकरणी व्यावसायिकाने नाशिक लाचलुचपत विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.
तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक येथील पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी शनिवारी (ता.२३) सारंगखेडा येथे सापळा रचला.
ठरल्यानुसार दहा हजाराची रक्कम स्वीकारताना पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचा वाहन चालक शिपाई गणेश गावित या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी यांचा पथकाने ही कारवाई केली.