मंत्रालयातील IAS अधिकाऱ्याच्या मुलीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या ?

Mantralaya IAS officer's daughter committed suicide by jumping from a building?

 

 

 

 

 

उच्च आणि तंत्र शिक्षणाचे सचिव तसेच वरिष्ठ आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरुन उढी मारुन आत्महत्या केली आहे.

 

 

 

 

आत्महत्येमागील कारण अद्याप समजलेलं नाही. सुनीती इमारतीवरुन उडी मारुन विकास रस्तोगी यांची कन्या लिपी रस्तोगी यांनी आत्महत्या केली आहे.

 

 

 

त्यांनी इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्तोगी हे 1995 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.

 

 

 

विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांची कन्या असलेल्या लिपी रस्तोगीने आत्महत्या केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

 

 

 

 

लिपीच्या खोलीमधून तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही मिळाली आहे. लिपी 27 वर्षांची होती. लिपीची आई राधिका या मुद्रा विभागामध्ये सचिव म्हणून कार्यरत आहेत.

 

 

 

 

आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास लिपीने इमारतीच्या 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन स्वत:ला संपवलं, असं ‘नागपूर टाइम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

 

 

 

उंचवरुन उडी मारल्याने या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तिला जीटी रुग्णालयामध्ये तिचे पार्थिव ठेवण्यात आलं आहे. मुलीने एवढं टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

 

 

 

 

आज दुपारच्या सुमारास मुंबईतील चंदनवाडी स्मशान भूमीवर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *