ट्रम्प यांच्या पहिल्याच निर्णयांमुळे भारतीयांवर मोठे संकट

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यापासून ते Action मूडमध्ये आहेत.
त्यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवसापासून इमिग्रेशनच धोरण कठोर बनवण्यास सुरुवात केली आहे.
ट्रम्प यांनी मेक्सिकोला लागून असलेली दक्षिणी सीमा आणि कुठल्या गुन्हेगारी टोळ्यांवर फास आवळायचा ते निश्चित केलं आहे.
स्थलांतरीत लोकांबद्दल ट्रम्प आधीपासूनच बोलत आहेत. आता त्यांचे निर्णय इमिग्रेशन विरोधात असतील. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या हजारो भारतीयांच्या अडचणी वाढू शकतात.
अमेरिकेने तिथे राहणाऱ्या भारतीयांना H-1B वीजा दिला आहे. सध्या 3 लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेत आहेत.
कुठल्याही अन्य देशांपेक्षा अमेरिकेत भारतीय विद्यार्थी जास्त संख्येने आहेत. ट्रम्प यांनी बेकायदरित्या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय घेतला,
तर 20 हजारच्या आसपास भारतीय असू शकतात. त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्र नाहीयत.
यात 17,940 असे भारतीय आहेत, त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्र नसतानाही त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं नाही.
2,467 भारतीय ताब्यात आहेत. अमेरिकेत ताब्यात घेण्यात आलेल्या आशियाई लोकांमध्ये भारतीय पहिल्या स्थानी आहेत.
नोव्हेंबर 2024 मध्ये बेकायद रित्या अमेरिकेत वास्तव्य केल्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या नागरिकांची संख्या 37 हजारपेक्षा जास्त आहे.
अमेरिकेच्या ICE ने भारताचा इराक, दक्षिण सूडान आणि बोस्निया-हर्जेगोविनासोबत सहकार्य न करणाऱ्या 15 देशांच्या यादीत समावेश केला आहे.
विनाकागदपत्राशिवाय राहणाऱ्या आपल्याच नागरिकांना जे देश स्वीकारायला तयार नाहीत, त्या यादीत भारताचा समावेश केला आहे.
ICE 2024 च्या वार्षिक रिपोर्ट्नुसार निर्वासित भारतीयांची संख्या चार वर्षात आधीच पाचपट झाली आहे. 2021 मध्ये ही संख्या 292 होती. 2024 मध्ये ही संख्या वाढून 1,529 झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र बनवायचं आहे. सातत्याने ते मेक अमेरिका ग्रेट अगेन म्हणत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच हित डोळ्यासमोर ठेऊन कुठलाही मोठा निर्णय घ्यायला मागे-पुढे कचरणार नाहीत.
याआधीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उदार विचारांचे होते. पण डोनाल्ड ट्रम्प तसे नाहीत.