महाराष्ट्र,मराठवाड्यात जून ,जुलै मध्ये पाऊस, कसा असेल ,हवामान विभागाने जाहीर केला अंदाज

How will the rains in Maharashtra and Marathwada be in June and July? Meteorological Department has announced the forecast.

 

 

 

 

भारतीय हवामान विभागाने (IMD) २०२५ च्या मान्सूनसंदर्भात दिलेला पहिला अंदाज उत्साहवर्धक आहे. जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

दरवर्षी सरासरी ८७ सेंटीमीटर पाऊस होतो, पण यंदा ९१.४ सेंमी (१०५%) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.

 

पण बिहार, तमिळनाडू आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण थोडं कमी राहू शकतं, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.

 

दरवर्षी ८६.८६ सेंमी पाऊस सरासरी धरला जातो. जर त्याच्या ±४% च्या रेंजमध्ये पाऊस झाला, तर तो ‘सामान्य’ मानला जातो. यंदा १०५% पावसाचा अंदाज म्हणजेच सरासरीहून अधिक पाऊस होईल.

 

मान्सून दरवर्षी १ जूनच्या सुमारास केरळमध्ये पोहोचतो. त्यानंतर हळूहळू देशभर पसरतो आणि सप्टेंबर अखेरीस परततो. उत्तर भारतात तो १५ ते २५ जूनदरम्यान पोहोचतो.

 

यंदा हवामान ‘न्यूट्रल’ स्थितीत राहणार आहे, म्हणजे एल निनोचा प्रभाव कमी असेल. ही परिस्थिती चांगल्या पावसासाठी फायदेशीर असते. हिंद महासागरात तापमानाचा फरकही नियंत्रित राहणार आहे.

 

त्यामुळे ‘IOD’ ही स्थितीही तटस्थ राहून पावसाला साथ देईल. सरकारने २०२२ मध्ये सरासरी पावसाचा आकडा ८७ सेंमी निश्चित केला आहे, त्यावरून आता अंदाज बांधले जातात.

 

२०१९ ते २०२३ या पाच वर्षांत फक्त २०२३ मध्ये स्कायमेटचा अंदाज पूर्णपणे अचूक ठरला. IMD ने २०२१ मध्ये ९८% पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि प्रत्यक्षात पाऊस ९९% झाला होता – म्हणजे अंदाज आता अधिक विश्वासार्ह होत आहेत.

 

पाऊस जास्त झाला तर खरीप पिकांची वेळेवर पेरणी होऊ शकते. जमिनीत पाणी साचेल, भूजल पातळी वाढेल आणि उत्पादनही चांगलं होईल. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागाला होईल.

 

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी सांगितलं की, मराठवाडा, दक्षिण व उत्तर मध्य महाराष्ट्रात ७० ते ८०% शक्यता आहे की ,

 

सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. IMD चे माजी अधिकारी अनुपम कश्यपी यांनीही एल निनो निष्क्रिय असल्याने राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

 

 

भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा सलग दुसऱ्या वर्षी देशात समाधानकारक मान्सून होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. जूनपासून सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत सरासरीपेक्षा सुमारे 5 टक्के अधिक पाऊस होईल, म्हणजेच सुमारे 105 टक्के पाऊस देशभरात होण्याची शक्यता भाकीत करण्यात आली आहे.

 

हवामान खात्याच्या मते, ९६ टक्क्यांपासून १०४ टक्क्यांपर्यंतचा पाऊस ‘सामान्य’ गटात येतो. भारतात दरवर्षी सरासरी सुमारे ८७ सेंटीमीटर पाऊस होतो, तर यंदा ही आकडेवारी ९१.४ सेंमीपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे.

 

हवामान विभाग मान्सूनपूर्व दोन टप्प्यांमध्ये अंदाज प्रसिद्ध करतो. पहिला अंदाज एप्रिलमध्ये जाहीर केला जातो आणि त्याला प्राथमिक इशारा समजले जाते. मात्र मे महिन्याच्या मध्यात येणारा दुसरा अंदाज अधिक अचूक आणि विश्लेषणाधारित असतो.

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा, दक्षिण व उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची ७० ते ८० टक्के शक्यता आहे.

 

IMD चे माजी अधिकारी अनुपम कश्यपी यांनीही यंदा एल निनो प्रभाव निष्क्रिय असल्याने राज्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील, असा अंदाज व्यक्त केला. मात्र,

 

अंतिम निर्णयासाठी मे महिन्यातील दुसऱ्या अंदाजाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात कधी येईल याचं चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. मात्र यावेळीही मान्सून वेळेत येतो की महिनाभर उशीर करतो याची प्रतिक्षा अजूनही शेतकऱ्यांना कायम आहे.

 

१९८८ पासून हवामान विभागाने मान्सून संदर्भात भाकित करायला सुरुवात केली. गेल्या ३७ वर्षांतील अनुभव पाहता, खात्याचे अंदाज अर्धे वेळा खरे, अर्धे वेळा चुकले आहेत.

 

अंदाजामध्ये +/– ५ टक्क्यांची चूक वैज्ञानिकदृष्ट्या ग्राह्य धरली जाते. यापैकी १९ वेळा अंदाज अचूक ठरले, तर १८ वेळा ते चुकले. विशेष म्हणजे २०२१ ते २०२४ दरम्यान सलग चार वर्षे IMD चे अंदाज पूर्णपणे बरोबर ठरले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचे तीन प्रमुख कारणे आहेत. एल निनो निष्क्रिय, ला-निनाची शक्यता: जागतिक हवामान नमुन्यांनुसार एल निनो प्रभाव मान्सून संपेपर्यंत टिकणार नाही.

 

ही परिस्थिती पावसासाठी पोषक मानली जाते. हिंद महासागरातील IOD स्थिती सकारात्मक राहण्याची शक्यता: इंडियन ओशन डाएपोल (IOD) जर सकारात्मक राहिला,

 

तर त्याचा थेट परिणाम पावसात वाढ होण्यात होतो. हिमालय व उत्तर गोलार्धातील बर्फाच्छादन घटले: डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत उत्तर गोलार्धात बर्फाच्छादन कमी नोंदवले गेले. हे घटक देखील चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल असतात.

 

१९७१ नंतर देशाने दुष्काळी स्थितीचा सामना केला होता. त्यानंतर २००१ पासून देशातील मान्सूनमध्ये सकारात्मक बदल दिसून आला आहे.

 

सुमारे ३० वर्षांच्या चक्रानुसार दुष्काळानंतर चांगल्या पावसाची साखळी तयार होते, असा अभ्यासकांचा अनुभव आहे. यंदाही हा सकारात्मक ट्रेंड कायम राहण्याची चिन्हे आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *