राज्यसभा आणि लोकसभेतून एकाच दिवशी ७८ खासदारांचं निलंबन

Suspension of 78 MPs from Rajya Sabha and Lok Sabha on the same day ​

 

 

 

 

राज्यसभा आणि लोकसभेतून आज एकूण ७८ खासदारांन निलंबित करण्यात आलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना निलंबित केलं.

 

 

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षांच्या ४५ खासदारांना निलंबित केलं आहे. यापूर्वी लोकसभेतून १४ खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे. त्यामुळं निलंबित खासदारांची संख्या ९२ वर पोहोचली आहे.

 

 

निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभा खासदार जयराम रमेश यांचाही समावेश आहे. यापैकी काही खासदारांना हिवाळी अधिवेशनाचा उर्वरित कालावधी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.

 

 

लोकसभेत केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

 

लोकसभेतून ३३ खासदारांचं निलंबन केल्यानंतर सभागृहाचं कामकाज ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. ओम बिर्ला यांनी सभागृहात फलक आणू नये असं सांगितलं होतं.

 

 

मात्र, संसदेच्या सुरक्षेचा भंग करुन युवकांनी केलेल्या घुसखोरीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक होते. यामुळं ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना निलंबित केलं.

 

 

यापैकी अब्दुल खालिक, विजय वसंत आणि के. जयकुमार यांच्या निलंबनाचा मुद्दा प्रिव्हिलेज कमिटीकडे पाठवण्यात आला आहे.

 

 

राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश, के. सी .वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांना देखील निलंबित केलं आहे.

 

 

 

यानंतर राज्यसभेचं कामकाज मंगळवारी सकाळी ११ पर्यंत स्थगित केलं आहे. राज्यसभेतून एकूण ४५ जणांचं निलंबन करण्यात आलं आहे.

 

 

त्यापैकी ३४ खासदारांना हिवाळी अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. तर, ११ खासदारांना प्रिव्हिलेज कमिटीचा रिपोर्ट येईपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.

 

 

साधारणपणे या समितीचा अहवाल तीन महिन्यात येतो.काही दिवसांपूर्वी डेरेक ओ ब्रायन यांचं निलंबन करण्यात होतं.

 

 

राज्यसभेतून प्रमोद तिवारी, जयराम रमेश, अमी याग्निक, नारायण भाई राठवा, शक्ति सिंह गोहिल, रजनी पाटील, सुखेंदु शेखर, नदिमुल हक, एन. षणमुगम, नसीर हुसैन,

 

 

 

फुलोदेवी नेताम, इमरान प्रतापगढी, रणदीप सुरजेवाला, मौसम नूर, समिरुल इस्लाम, रंजीत रंजन, कनिमोझी, फैयाज अमजद, मनोज झा,

 

 

रामनाथ ठाकुर, अनिल हेगडे, वंदना चव्हाण, रामगोपाल यादव, जावेद अली खान, जोस के मणी, महुआ मांझी आणि अजीत कुमार यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *