BREAKING NEWS;मंत्र्याला कोर्टाने सुनावली 3 वर्षांची शिक्षा
The court sentenced the minister to 3 years imprisonment
मद्रास हाय कोर्टाने बुधवारी तमिळनाडूतील डीएमकेचे नेते आणि स्टॅलिन सरकारमधील मंत्री के पोनमुडी यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
तसेत ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. उत्पनाच्या स्रोताची योग्य माहिती न दिल्याबद्दल त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोनमुडी यांच्या पत्नीला देखील शिक्षा झाली आहे.
मंत्री आणि त्यांच्या पत्नी यांनी कोर्टात वैद्यकीय अर्ज सादर केला असून पोनमुडी हे ७३ वर्षाचे तर पत्नी ६० वर्षांची असल्याने कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली. कोर्टाने जोडप्याला तीन वर्षांचा साधा तुरुंगवास सुनावला आहे.
तसेच दोघांना प्रत्येकी ५० लाखांचा दंड ठोठावला आहे.तसेच दोषींना सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करता यावी यासाठी ३० दिवसांसाठी शिक्षेला स्थगिती दिली आहे.
DMK च्या २००६ ते २०११ या कार्याकाळात पोनमुडी हे मंत्री होते. याकाळात त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप करत भ्रष्टाचार प्रतिंबध विभागाने २००२ मध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
२०१२ मध्ये सत्तेत आलेल्या AIADMK यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी आरोप करण्यात आला होता की, पती-पत्नीने १.४ कोटी संपत्तीचा कोणताही स्रोत सांगितलेला नाही.
वेलोरच्या स्थानिक कोर्टाने पोनुमेडी आणि त्यांच्या पत्नीला पुराव्यांअभावी २०१६ मध्ये निर्दोष ठरवलं होतं. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मद्रास हायकोर्टाने याप्रकरणात सु-मोटो दाखल करुन घेतली होती.
यावर सुनावणी करताना कोर्टाने मंगळवारी पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला दोषी ठरवलं. पण, कोर्टाने अंतिम निकाल राखून ठेवला होता. आज कोर्टाने मंत्री आणि त्याच्या पत्नीला तीन वर्षाचा तुरुंगवास सुनावला आहे.