राज्य सरकारचा मोठा निर्णय ;या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळाची मदत

A big decision of the state government; the farmers of these 15 districts will get drought relief

 

 

 

 

राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या वतीने पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे.

 

 

दुष्काळ आणि दुष्काळसदृश्या परिस्थितीत घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्या ही स्थगिती असणार आहे. यासोबतच इतर तालुक्यांतील एकूण 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

 

 

पुढील निर्णयांना स्थगिती
1) जमीन महसूलात सूट.
2) सहकारी कर्जाचे पुनर्गठन.

 

 

3) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती.
4) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.

 

 

5) शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी.
6)रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.

 

 

7) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर.
8)टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

 

 

 

या निर्णयानुसार विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद केलेल्या 10316 महसुली मंडळामध्ये उपाययोजना तातडीने अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

 

 

पुढील जिल्ह्यात स्थगिती
नंदुरबार – नंदुरबार तालुका
धुळे – सिंदखेडा तालुका
जळगाव- चाळीसगाव तालुका

 

 

बुलढाणा – बुलढाणा आणि लोणार तालुका
जालना – भोकरदन , जालना ,बदनापूर ,अंबड, मंठा तालुका

 

 

छत्रपती संभाजीनगर – सोयगाव, छत्रपती संभाजीनगर , तालुका
नाशिक- मालेगाव , सिन्नर, येवला , तालुका

 

 

पुणे – पुरंदर सासवड , बारामती, तालुका , शिरूर घोडनदी , दैड, इंदापूर तालुका
बीड – वडवणी ,धारूर , अंबेजोगाई , तालुका

 

 

लातूर – रेणापूर , तालुका
धाराशिव – वाशी , धाराशिव , लोहारा , तालुका

 

 

 

सोलापूर – बार्शी ,माळशिरस , सांगोला , करमाळा,माढा तालुका
सातारा – वाई ,खंडाला ,

 

 

 

कोल्हापूर – हातकंगले, गढहिंगलज ,
सांगली – शिराळा , कडेगाव , खानापूर विटा , मिरज तालुका

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *