ट्रेनमध्ये २ दिवसानंतरही करता येणार ‘त्याच’ तिकीटावर प्रवास

You can travel on the 'same' ticket even after 2 days in the train ​

 

 

 

 

 

दररोज लाखो आणि करोडो लोकं रेल्वेनं प्रवास करतात. काही कारणांमुळे अनेकांच्या गाड्या चुकतात. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा नवीन तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो.

 

 

पण तुम्हाला माहीत आहे का? की तुम्ही कोणतेही पैसे न खर्च करता एकाच तिकिटावर 2 दिवसांनंतरही प्रवास करू शकता. जर तुम्हाला हे माहित नसेल, तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.

 

 

वास्तविक भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही तुमचं तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख बदलू शकता. त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. तुम्ही 2 दिवसांनंतरही या तिकिटावर प्रवास करू शकता.

 

 

 

अनेक वेळा गाड्या चुकतात. अशा परिस्थितीत, रेल्वे तुम्हाला पुढील 2 स्टेशनवरून तुमची ट्रेन पकडण्याची सुविधा देते. त्यानंतर तुम्ही तुमचा प्रवास पूर्ण करू शकता.

 

 

 

अनेक वेळा लोकं तिकीट अगोदर बुक करतात, पण काही त्यांचं कारणास्तव नियोजन बदलतं. अशा परिस्थितीत नवीन तिकीट खरेदी करण्याची गरज नाही. त्याच तिकिटावर तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवू शकता.

 

 

 

तुमचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला तिकीट जमा करणाऱ्या संबंधित व्यक्तीशी संपर्क साधावा लागेल. तो पुढचे तिकीट तयार करून तुम्हाला देईल.

 

 

तुमची ट्रेन चुकली तर तुम्ही दोन स्टेशननंतर पुन्हा ट्रेनमध्ये चढू शकता. तोपर्यंत टीटी तुमची जागा कोणालाही देणार नाही.

 

 

 

ट्रेनमध्ये ब्रेक जर्नी करता येवू शकते. या नियमाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्ही 500 किमी पेक्षा जास्त प्रवास करत असाल, तर तुम्ही मध्ये ब्रेक घेऊ शकता.

 

 

 

जर प्रवास 1000 किमीचा असेल तर तुम्ही दोन ब्रेक घेऊ शकता. तुम्ही प्रवास करता तेव्हा, तुम्ही बोर्डिंग आणि ड्रॉपिंगची तारीख वगळून 2 दिवसांचा ब्रेक घेऊ शकता. परंतु हा नियम शताब्दी, जनशताब्दी आणि राजधानीसारख्या गाड्यांना लागू होत नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *