शिंदे गटाच्या खासदाराच्या स्वीय सहाय्यकाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस
Income Tax Department notice to Personal Assistant of Shinde Group MP

शिवसेना खासदार भावना गवळी यांचे पूर्वश्रमीचे स्वीय सहाय्यक अशोक गांडुळे यांच्या भावना अग्रोटेक कंपनीला आयकर विभागाची नोटीस आली आहे.
या कंपनीशी संबंध नसून या कंपनीत संचालक किंवा कोणत्याही पदावर राहिलेली नाही, असे स्पष्टीकरण खासदार भावना गवळी यांनी दिलं आहे.
खासदार भावना गवळी यांच्या पूर्वश्रमीचे स्वीय सहाय्यक असलेले अशोक गांडुळे यांच्या भावना अग्रोटेक कंपनीला आयकर विभागाची नोटीस दिल्याची माहिती मिळाली आहे.
भावना गवळी यांनी यावेळी सांगितले की, माझा या कंपनीशी काहीही संबंध नाही, मी कधीही या कंपनीत संचालक किंवा कोणत्याही पदावर राहिलेली नाही.
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांचे पूर्वश्रमीचे स्वीय सहायक अशोक महाजन गांडुळे यांच्या नावे असलेल्या भावना अग्रोटेक कंपनीमध्ये खासदार भावना गवळी
यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या खात्यातून भावना अग्रोटेकमध्ये पैसे वळते करून घोटाळा केला. याच घोटाळ्याची तक्रार भावना गवळी यांनी रिसोड पोलीस ठाण्यात दिली आहे.
भावना गवळी यांचे पूर्वश्रमीचे स्वीय सहायक असलेले आणि त्यांचे जवळील लोक, CA अशोक मुळे यांना आयकर विभागाने नोटीस बजावली असल्याची माहिती आहे. कंपनीशी संबंध नाही,कंपनीत कुठल्याही पदावर नव्हते, असे भावना गवळी यांनी सांगितलं.
खासदार भावना गवळी यांच्यावर या आधी ईडीने कारवाई केली होती. शिंदे गटात गेल्यानंतर मात्र त्यांच्यावरील कारवाई काहीशी थांबवल्याचं चित्र होतं.
मात्र आता सत्तेत असूनही त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली होती. भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं असल्याची माहिती आहे.
कर चुकवल्याप्रकरणी आयकर विभागाने त्यांचं बँक खातं गोठवलं आहे. 8 कोटी 26 लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.
कर चुकवगिरीप्रकरणी आयकर विभागाने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे.
मात्र खासदार भावना गवळींनी संस्थेचे खातं सील झाल्याची बातमी फेटाळली. अशी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आली नसल्याची माहिती त्यांनी दिली.