महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
Heavy rain warning in Maharashtra

देशातील काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाल्याने ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी कोसळत आहे. अवकाळीमुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
पावसाचं संकट कधी दूर होणार, याची वाट बळीराजा पाहत आहे. अशातच हवामान खात्याने अवकाळीबाबत मोठी अपडेट दिली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये आज आणि उद्या हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय,
तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, पुडुचेरी आणि कराईकल या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान संस्थेने वर्तवला आहे.
तर ८ ते १० जानेवारी दरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये तुरळक मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशात ८ ते १० जानेवारी या कालावधीत वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
दुसरीकडे तामिळनाडूच्या काही भागात
आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस सुरू राहू शकतो. पुढील २४ तासांत केरळम, कर्नाटक, कोकण आणि गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी रात्रीच्या सुमारास महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. सिंधुदुर्गातील काही भागात गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला कुडाळ, सावंतवाडी
तालुक्यात या अवकाळी पावसाने हजेरी लावली. पालघर जिल्ह्यातील सफाळे, मनोर , कुडुस भागातही सोमवारी रात्री पाऊस झाला. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.