लाचखोरीत मराठवाडा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

Marathwada ranks second in bribery

 

 

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकरा महिन्यांत ११६ सापळे रचून १५४ जणांना ताब्यात घेतले. यात वर्ग एकपासून चारपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 

 

 

राज्यभरात नाशिक विभागानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक लाच प्रकरणात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

 

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जानेवारी ते ०६ नोव्हेंबर या दरम्यान राज्यात आठ विभागांत एकूण ७०६ सापळ्यांमध्ये ९८० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

 

अपसंपदाची राज्यात आठ प्रकरणे समोर आलेली आहे. अशा प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यभरात लाच प्रकरणांमध्ये १२ टक्के वाढ दिसून आलेली आहे. जानेवारी ते सहा नोव्हेंबर या काळात गेल्या वर्षी ६२८ सापळ्यांमध्ये ८८५ जणांवर कारवाई करण्यात आली हेाती. यंदा ही संख्या ७८ ने वाढलेली आहे.

 

 

 

विभागात यंदा प्रकरणांची वाढ

जिल्हानिहाय कारवाया
छत्रपती संभाजीनगर- ४४
जालना २५
बीड २३
धाराशिव २४

 

 

 

 

 

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ३० ऑक्टोबरला भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्त हस्तपत्रके वाटणे, पोस्टर्स, स्टिकर्सद्वारे जनजागृती करून माहिती दिली जात आहे.

 

 

 

जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यात भ्रष्टाचाराविरुद्ध जागरुकता निर्माण करण्यात आली आहे. हा उपक्रम पाच नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात आला.

 

 

 

लोकसेवकांकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांनी केले आहे.

 

 

हा क्रमांक २४ तास सुरू असतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यास भ्रष्टाचारी लोकसेवक पकडले जाऊन त्यांना न्यायालयातून शिक्षा होते. नागरिकांनी केलेल्या तक्रारी संदर्भात पूर्ण गुप्तता पाळली जाते, अशी माहिती संदीप आटोळे यांनी दिली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *