भारत जोडो न्याय यात्रेचा शुभारंभ;राहुल गांधी म्हणाले भाजपसाठी कदाचित मणिपूर भारताचा भाग नसेल

Bharat Jodo Nyaya Yatra kicks off; Rahul Gandhi says Manipur may not be part of India for BJP

 

 

 

 

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी यावेळी भारत जोडो न्याय यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.

 

 

 

राहुल गांधी यांनी यावेळी मणिपूरच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला आहे.

 

 

 

आजपर्यंत भारताच्या पंतप्रधानांना मणिपूरला जाण्यासाठी वेळ मिळाला नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएससाठी कदाचित मणिपूर भारताचा भाग नसेल, असं राहुल गांधी म्हणाले.

 

 

काँग्रेस नेत्यांना मणिपूरमध्ये पोहोचण्यास विमानामुळं उशीर झाला. यामुळं राहुल गांधी यांनी मणिपूरच्या जनतेची माफी मागितली. मणिपूरच्या जनतेशी संवाद साधतान राहुल गांधी यांनी

 

 

२९ जूननंतर मणिपूरमध्ये राज्य व्यवस्थेची पायाभूत रचना उद्धवस्त झाल्याचा आरोप केला. राज्यात द्वेष पसरला आहे, असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला.

 

 

 

आम्हाला कन्याकुमारी ते काश्मीर या पहिल्या भारत जोडो यात्रेप्रमाणं ही यात्रा पूर्व ते पश्चिम करायची होती. यात्रा सुरु करण्यापूर्वी अनेकांनी सूचना दिल्या.

 

 

 

पण मी भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरु होऊ शकेल, असं म्हटलं. आम्हाला द्वेष मिटवून भारताला एका सूत्रात बांधायचं आहे.

 

 

लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याकडे वेळ कमी असल्यानं हायब्रीड स्वरुपात यात्रा सुरु करत आहोत. भारत जोडो न्याय यात्रेत यावेळी बसेसचा वापर होणार आहे.

 

 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मणिपूरच्या थौबलमधून भारत जोडो न्याय यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. दिल्लीहून या यात्रेच्या शुभारंभासाठी काँग्रेसशासीत राज्यांचे मुख्यमंत्री, प्रमुख नेते उपस्थित होते.

 

 

दरम्यान, मणिपूरमधून आजपासून सुरु झालेली भारत जोडो न्याय यात्रा २० मार्च रोजी मुंबईत पोहोचणार आहे. ही यात्रा १०० लोकसभा मतदारसंघातून प्रवास करेल. या यात्रेत इंडिया आघाडीतील नेत्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आलं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *