संजय राऊत म्हणाले आम्ही २३ जागा लढणार

Sanjay Raut dijo que competiremos por 23 escaños

 

 

 

 

ठाकरे गटाच्यावतीनं मंगळवारी महापत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती. शिवसेनेच्या २०१३, २०१८ मधील पक्षांतर्गत निवडणुकीच्या ठरावाचे व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आले.

 

 

यामध्ये २०१३ मध्ये शिवसेनाप्रमुख हे पद गोठवण्यात आल्याचा पहिला ठराव मंजूर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

 

 

 

ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेनंतर बुधवारी संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली.

 

 

 

नार्वेकरांनी साडेअकरा कोटी जनतेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसल्याची टीका करत तुम्ही कसले मराठी माणूस, बकवास आहात तुम्ही.. असं म्हटलं आहे.

 

 

 

संजय राऊत पुढे म्हणाले, राहुल नार्वेकर अजूनही अध्यक्षांच्या भूमिकेमध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे. मुळात शिंदेंचा पक्ष हा शिवसेना नाहीच, ओढून ताणून केलेला प्रकार आहे.

 

 

आम्ही पूर्वीही २३ जागा लढत होतो आणि आजही लढणार आहोत. त्यामुळे खरा पक्ष आमच्याकडे आहे. असं म्हणत राऊतांनी शिंदेंना चिमटा काढला आहे.

 

 

 

”शिंदेंनी केलेल्या प्रकाराला याला पाकिटमारी म्हणतात. मुंबईतल्या शिंदे गटाच्या जागा मुंबईतले भांडवलदार लढवतील, असं दिसतंय.”

 

 

 

असं म्हणत संजय राऊतांनी नार्वेकरांचा निकाल, मिलिंद देवरांचा प्रवेश आणि भाजपच्या राजकारणावर सडकून टीका केली.

 

 

 

शिवसेनाप्रमुख हे शिवसेनेतले सर्वोच्च पद आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत १९ सदस्य आहेत. २०१८च्या बदलानुसार शिवसेनेत १३ सदस्य आहेत. पक्षप्रमुख हे सर्वोच्च पद आहे,

 

 

 

मात्र ते ग्राह्य धरता येणार नाही कारण ते शिवसेनेच्या घटनेत ते नाही. १९९९ च्या घटनेत शिवसेनाप्रमुख हे जे पद आहे, त्याच धर्तीवर २०१८ च्या घटनेतील पक्ष प्रमुख हे पद आहे.

 

 

 

पक्षप्रमुखांना निर्णयाचा एखाद्या व्यक्तीला पक्षातून काढण्याचा अंतिम अधिकार असेल असे ठाकरे गटाकडून म्हटले गेले. पण पक्षप्रमुखांना सदस्याला पक्षातून काढण्याचा अधिकार नाही.

 

 

 

कारण पक्षप्रमुखांचा हा अधिकार मान्य केला तर ते कोणत्याही व्यक्तीला दहाव्या परिशिष्टाचा आधार घेत पक्षातून काढू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना काढण्याचा अधिकार मान्य नाही, असे नार्वेकरांनी सांगितले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *