मोहम्मद अझरुद्दीन यांना विधानपरिषदेची उमेदवारी न दिल्याने मुजीब खान यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा
Mujeeb Khan resigned from the Congress party for not giving the Legislative Council nomination to Mohammad Azharuddin

काँग्रेस पक्षाला तेलंगणामध्ये मुस्लिम समाजाने भरभरून मते दिली परंतु मंत्रिमंडळामध्ये एकही मुस्लिम चेहऱ्याचा समावेश करण्यात आल्यामुळे काँग्रेस विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे,
त्यातच भर म्हणून कि काय विधानपरिषदेच्या जागेवर मुस्लिम चेहरा आलेल्या मोहम्मद अझरुद्दीनचा समावेश करण्यात येईल असे सर्वांना वाटत होते
परंतु आज काँग्रेस पक्षाकडून विधपरिषदेच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली त्यात एकही मुस्लिम चेहरा नसल्यामुळे तेलंगणा मध्ये काँग्रेसला
मुस्लिम समाजाच्या मोठ्या उद्रेकाचा भविष्यात सामना करावा लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसकडून मुस्लिम समाजाला सतत डावलले जात असून मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासारख्या पक्षनिष्ठ नेत्रत्वाला
पक्षाकडून विधानपरिषदेवर उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्षाच्या सद्यस्त्वाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात मोहम्मद मुजीब नमूद केले आहे कि ,मी मोहम्मद मुजीब माझे संपूर्ण आयुष्य काँग्रेसला दिल्यावर माझ्या कारकिर्दीची सुरुवात
महान श्री राजीव गांधी यांच्यासोबत झाली ,आणि 1986 मध्ये मूळ फोटोवर ऑटोग्राफ घेऊन 14 वर्षाच्या वयापासून ते आज 53 वर्षां पर्यंत मी पक्षात NSUI ते युवक काँग्रेस आणि फादर काँग्रेसपर्यंत वेगवेगळ्या राजकीय पदांवर काम केले.
दिवंगत श्री विलास राव देशमुख यांच्यापासून ते अहमद पाटील, श्री मुकुल वासनिक, यांच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून
आणि आता श्री राहुल गांधी यांच्याकडून मुस्लिमांच्या मोठ्या आशेने, आमचा काँग्रेसवरील विश्वास उडाला आहे. तेलंगणातून मोहम्मद अझरुद्दीन हे नाव मुस्लिमांमध्ये सर्वात मोठे आहे ते तो आपल्या सर्वांचे हिरो आहेत जेव्हा ते जेंव्हा निवडणूक हरले
त्यावेळेला असे वाटले पराजयानंतरही राहुल गांधी तेलंगणात एमएलसी आणि मंत्रीपद देतील पण आज दोन नावे पाहिल्यावर
श्री. केसी वेणुगोपाल यांनी प्रेस नोट दिली ते पाहून धक्का बसला आहे आणि पुढची पायरी लोकसभेत श्री केसी वेणुगोपाल यांना केरळमध्ये तोंड दाखविणे कठीण होईल.
भविष्यात तुम्हाला मुस्लिम तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत, कारण तुम्ही काँग्रेस पक्षाचे मुख्य नियोजक आणि धोरण निर्माते नेते आहात.
तुमच्यामुळे काँग्रेसची पकड कमी होत चालली आहे आणि तुमच्या निर्णयामुळे संपूर्ण मुस्लिम समाज खूप नाराज आहेत, मी 38 वर्षांनी काँग्रेस पक्षात काम केले आणि आज राजीनामा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला आहे, कृपया याची नोंद घ्या धन्यवाद….
मुजीब खान
ex MPCC secretary