केजरीवालांचा इंडिया आघाडीला सर्वात मोठा धक्का;घेतला मोठा निर्णय

Kejriwal's biggest blow to the India Alliance; the big decision taken ​

 

 

 

 

ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना रविवारी (२८ जानेवारी) इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधणाऱ्या नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून माघार घेतली.

 

 

बिहारमधील राष्ट्रीय जनता दलासोबतची युती तोडून त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ही जखम ताजी असतानाच इंडिया आघाडीला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

कारण, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. हरियाणातील आगामी विधानसभा निवडणूक आप एकट्याने लढणार असल्याचं केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे.

 

 

 

मात्र, असं असलं तरी, या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्ष इंडिया आघाडीसोबत लढणार आहे, असंही केजरीवाल यांनी सांगितले.

 

 

हरिणायात विधानसभेच्या 90 जागा आहे. या जागा आप स्वबळावर लढणार असल्याचं केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे.

 

 

 

त्यांच्या या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यात विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का देत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार असल्याची घोषणा केली होती.

 

 

 

त्यानंतर बिहारमधील नितीश कुमार यांचा जेडीयू पक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडला आहे. त्यातच आता अरविंद केजरीवाल

 

 

 

यांनी हरियाणातील विधानसभेच्या निवडणुका आप एकट्याने लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी दरवाजे खुले ठेवले आहेत.

 

 

 

“आज हरियाणा एका मोठ्या बदलाची वाट पाहत आहे. आधी दिल्ली आणि पंजाबमध्ये लोकांनी हा मोठा बदल केला आणि आता तिथले लोक आनंदी आहेत.

 

 

 

आप सर्व 90 जागांवर निवडणूक लढवणार असून हरयाणात आम्ही पुढचे सरकार स्थापन करू. या देशाचे नंबर १ राज्य बनवले जाईल.”, असं केजरीवाल यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *