पाहा ;VIDEO;जगातील पहिली एआय रोबोट झाली कंपनीची बॉस ,घेतेय मिटिंग

Watch ;VIDEO; The world's first AI robot became the boss of the company, taking a meeting

 

 

 

 

एआय, म्हणजेच आर्टिफिशिअल इंटिलिजन्समुळे कित्येकांच्या नोकऱ्या जातील याची भीती व्यक्त करण्यात येते. याचा फटका आता केवळ सामान्य कर्मचाऱ्यांनाच नाही,

 

 

 

तर कंपनीच्या सीईओंना देखील बसणार आहे. कोलंबियामधील एका कंपनीने चक्क मिका नावाच्या एका एआय चॅटबॉटला सीईओ पदावर नियुक्त केलं आहे.

 

 

 

डिक्टाडोर ही कोलंबियातील कार्टाजेना येथील एका स्पिरिट निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीने हॅन्सन रोबोटिक्स कंपनीसोबत मिळून एक एआय रोबोट तयार केला होता.

 

 

 

मिका नावाच्या या रोबोटलाच कंपनीने आपली सीईओ म्हणून नियुक्त केलं आहे. हॅन्सन कंपनीनेच यापूर्वी प्रसिद्ध ह्यूमॅनॉईड रोबोट सोफिया देखील तयार केली होती.

 

 

 

कंपनीने एका इव्हेंटमध्ये मिकाला सर्वांसमोर सादर केलं होतं. यावेळी आपण एक्स (ट्विटर) कंपनीचे मालक इलॉन मस्क आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग या दोघांपेक्षा सरस असल्याचा दावा मिकाने केला होता.

 

 

 

“या दोन टेक बॉसेसच्या एमएमए फाईटची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांचे प्लॅटफॉर्म सुधारण्याचा हा मार्ग नाही”, असं ती म्हणाली

 

 

 

“आपल्याला एआयला लोकांची काळजी घेणं शिकवावं लागेल, जेणेकरून एआय अधिक सुरक्षित आणि खरोखरच चांगलं होईल”, असंही मिका यावेळी म्हणाली.

 

 

 

“अ‍ॅडव्हान्स एआय आणि मशिन लर्निंग अल्गोरिदम यामुळे मी अधिक जलद आणि अधिक योग्य निर्णय घेऊ शकते. मी आठवड्याची सुट्टी घेत नाही. 24×7 मी कामावर हजर असते.” असंही मिकाने यावेळी स्पष्ट केलं.

 

 

 

“मी कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करत नाही. तसंच, कंपनीच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी मी सक्षम आहे.” असंही ती म्हणाली.

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *