‘राष्ट्रवादी’ आणि घड्याळ अजितदादाकडे ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

'Nationalist' and the clock to Ajitdada ; Big decision of Election Commission ​

 

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हा अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदार

 

 

 

आणि खासदारांसह अजित पवार हे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांनी दावा केला होता.

 

 

 

मुळ पक्ष कोणाचा यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. गेल्या ६ महिन्यात यासंदर्भात १० सुनावणी झाल्यानंतर

 

 

अखेर आयोगाने हा निर्णय दिला. या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ आता शरद पवार यांना पक्ष आणि चिन्ह गमवावे लागले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

 

 

अशात अजित पवारांनी या निर्णयावर स्वत:ची प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय मी नम्रपणे स्वीकारतो असे अजित पवारांनी म्हटले आहे.

 

 

 

आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत! असे अजित पवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे या पोस्टच्या खाली त्यांनी अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा उल्लेख केला आहे.

 

 

 

ज्या दिवशी आमची राष्ट्रीय मान्यता काढली गेली होती, त्या दिवशी माझ्या मनात पाल चुकचुकली होती. आमच्या दृष्टीने निवडणूक आयोगाला जे सांगायचं ते आम्ही सांगितलं होतं.

 

 

हा सांगण्यात आलेलं आहे, की चिन्ह आणि पक्ष तुमच्या ताब्यात देऊ. ज्या माणसाने जन्माला घातलं, त्याने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, त्याने तुम्हाला सुसंस्कृत केलं.

 

 

ते सर्व तुम्ही खेचणार त्याच्या हातातून? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ज्या पक्षाला निर्माण यांनी केलं, ज्या पक्षातून हे मंत्री झाले.

 

 

 

 

 

तटकरेंपासून अजित पवारांपर्यंत कुणाच्या जीवावार झालं आणि अजित पवारापर्यंत शरद पवारांच्या जीवावार झाले ना? आम्हाला माहिती होतं पक्ष आणि चिन्ह काढून घेणार आहेत. आमचं चिन्हच शरद पवार आहे.

 

 

 

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाकडून लागल्यानंतर आता शरद पवार गटाने चार चिन्हांची निश्चिती केल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

त्यापैकी एका चिन्हाची निवड करून बुधवारी निवडणूक आयोगाला त्याची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला आपल्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना देण्याची मुदत आहे.

 

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधी शिवसेनेचा निकाल देताना शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं होतं. तशाच प्रकारचा काहीसा निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत येऊ शकतो

 

 

अशी काहीशी शंका शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांना होती. त्यामुळेच जर पक्ष चिन्हाचा निकाल अजित पवार गटाकडून लागलाच तर काय करायचं हे धोरणही आधीच ठरल्याची माहिती समोर येतेय.

 

 

निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला जातोय.

 

 

देशातील जवळपास सर्वच संविधानिक संस्थांनी स्वायत्तता गमावली असल्याने तर्कहीन निर्णय देऊन तांत्रिक कारणे पुढे केली गेलेली सकृतदर्शनी दिसत आहे.

 

 

 

या निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू. या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *