भाजपच्या फोडाफोडीला मतदारांनी नाकारले ;निवडणुकीत बसणार फटका?

Voters rejected BJP's crackdown; Will the election be hit? ​

 

 

 

 

 

देशभरात सध्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्येही भाजप मजबूत आकडा गाठत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल असं एकंदरीत वातावरणावरून स्पष्ट होत आहे.

 

 

निवडणुकांआधी झालेल्या सर्व्हेंमधूनही भाजप ३०० आकडा पार करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रचंड राजकीय उलथापालथ झालेल्या महाराष्ट्रात मात्र भाजपच्या ४०० पार च्या

 

 

 

महत्त्वाकांक्षी रथाला लगाम लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बंड करून भाजपसोबत

 

 

सरकार स्थापन केलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट दोघांच्या अकत्रित जागा एकअंकी आकड्याच्या पुढे जाण्याची शक्यता कमी आहे.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा निश्चित केला. 2024 मध्ये भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करताना, केवळ आकडेवारीच नाही

 

 

तर देशाचा मूडही भाजपच्या बाजूने आहे. त्यामुळे देशाची जनता एनडीएच्या ४०० जागा निवडून देईल, असा विश्वास व्यक्त केला होता.

 

 

 

मात्र राम मंदिरानंतर देशात भाजपचा जनाधार वाढला असला तरी हे लक्ष्य गाठणं तितकं सोप असणार नाही. महाराष्ट्राविषयीच बोलायचं झालं तर मागच्या ५ वर्षात राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ पहायला मिळाली

 

 

 

दोन मोठे पक्ष फुटून भाजपसोबत गेले. याचा भाजपच जबाबदार असल्याची चर्चा आहे आणि आता MoTN च्या सर्वेमधून तर महाराष्ट्रात लोकसभेचा कौल

 

 

 

महाविकास आघाडीच्या बाजून झुकताना दिसत आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका बसण्याची शक्यता या सर्व्हेंमधून व्यक्त करण्यात आली आहे.

 

 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह राहुल गांधींची काँग्रेस महाराष्ट्रात आघाडी घेण्याची शक्यता आहे. आघाडी घेणार शिवसेना, राष्ट्रवादी पक्षात मोठी बंडखोरी असूनही महाविकास आघाडीचा या निवडणुकीत वरचष्मा राहणार आहे.

 

 

 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महाराष्ट्रात युतीचे सरकार चालवणाऱ्या भाजपला स्वबळावर जितक्या जागा मिळाल्या होत्या तितक्या जागाही मिळताना दिसत नाहीत.

 

 

MoTN च्या सर्वेक्षणानुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात 48 पैकी फक्त 16 जागांवर विजय मिळवेल. भाजपला 7 जागांचं थेट नुकसान होऊ शकतं.

 

 

एकंदरीत, महाराष्ट्रात भाजप युतीला २२ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर २०१९ मध्ये एकट्या भाजपने लोकसभेच्या २३ जागा जिंकल्या होत्या.

 

 

त्यावेळी शिवसेनेत बंडखोरी झाली नव्हती. भाजपसोबतची युती झाली होती, त्यावेळी शिवसेनेने १९ जागावर विजय मिळवला होता.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *