पाहा VIDEO ;पंतप्रधानांच्या सभेत तरुणी चढली थेट इलेक्ट्रिक टॉवरवर; मोदींचा जीव टांगणीला

Watch the video; Young woman climbs directly on the electric tower at the Prime Minister's meeting; Modi's life hangs in the balance

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणाच्या सिकंदराबादमधील एका जनसभेला संबोधित केलं. या सभेदरम्यान एक विचित्र घटना घडल्यामुळे जनतेसह पंतप्रधान मोदींचं टेन्शन वाढलं होतं.

 

 

पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधण्यासाठी ती थेट लाईट टॉवर चढली. पंतप्रधान मोदींची नजर त्या मुलीवर पडताच ते म्हणाले, बेटा, तू खाली ये. हे करणे योग्य नाही, त्याची वायर खराब झाली असल्याचं म्हणत त्या तरुणीला खाली उतरण्याची विनंती केली.

 

 

 

पंतप्रधान मोदी तिची वारंवार विनंती करतात. परंतु टॉरवर चढलेली तरुणी त्यांचं काही ऐकत नाही. तरूणी ऐकत नसल्यानं पंतप्रधान मोदींचं चिंता वाढली होती.

 

 

 

मी तुझं म्हणणं ऐकतो, मी तुझ्या पाठीशी आहे बेटा, कृपया खाली ये. वायर खराब झालीय. तू खाली ये, मी तुझे ऐकतो, असं म्हणत मोदी तिला खाली उतरण्याची विनंती केली. परंतु ती मुलगी टॉवरच्या वरती जाऊ लागली.

 

 

 

तेव्हा मोदी तिला शॉर्ट सर्किट झाल्याचं सांगतात. तू खाली ये. येथे असं करून फायदा होणार नाही. मी तुमच्यासाठी येथे आलोय. तुम्ही कृष्णाजींचे ऐका असं मोदींनी सांगितलं.

 

 

 

यानंतर मुलगी खाली उतरते. त्यानंतर पंतप्रधान मोदींचा जीव भांड्यात पडला. मुलगी खाली उतरल्यानंतर त्यांनी तिचे आभार मानले. दरम्यान आभार मानले. मात्र मुलगी टॉवरवर का चढली हे कळू शकलेले नाही.

 

 

 

या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि बीआरएसवर निशाणा साधला. काँग्रेस आणि बीआरएस एकत्र आहेत. ते पडद्यामागे त्यांचा खेळ खेळतात. एका बाजूला काँग्रेस आणि बीआरएस आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप आहे.

 

 

काँग्रेस आणि बीआरएसची लोकांवर राज्य करण्याची मानसिकता आहे. तर भाजप जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. तेलंगणातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे.

 

 

 

आणखीन एक व्हायरल झालेल्या दुसर्‍या व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदी हे माडिगा आरक्षण पोराटा समिती (एमआरपीएस) चे प्रमुख मंदा कृष्णा मडिगा यांना सांत्वन देताना दिसले, जे सार्वजनिक रॅलीदरम्यान दृश्यमानपणे भावूक झाले होते.

 

 

व्हिडिओमध्ये रॅलीदरम्यान पीएम मोदींच्या शेजारी बसलेल्या मडिगाला अश्रू अनावर झाले होते. पंतप्रधानांनी तत्परतेने दलित नेत्याला मिठी मारली आणि त्याच्या डोक्यावर हलकेच थोपटले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी मडिगा यांचा हात धरून भावनिक क्षणी एकता व्यक्त करत आश्वासन दिले.

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *