शरद पवार गटाचा मोठा नेता आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा ;राजकीय चर्चाना उधाण
Big leader of Sharad Pawar group - Ajit Pawar's closed door discussion; political discussion is on the rise

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर राज्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे.
एकमेकांवर भरसभेत तारेशे ओढताना दिसत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांर्तगत वेगवेगळ्या हालचाली होताना दिसत आहे.
या सगळ्यातच शरद पवार गटाचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार राजेश टोपे यांनी अजित पवार यांची सकाळी भेट घेतली आहे.
पुण्यातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून पुण्यातील सर्कीट हाऊसमध्ये बैठका सुरु आहेत.
राजेश टोपे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते शरद पवारांच्या गटात आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील राजेश टोपे हे आरोग्य मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे सगळेच नेते सोडून जात असताना आज सकाळीच अजित पवारांची राजेश टोपे यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महत्वाचं म्हणजे या दोघांची बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय घडलं? ही भेट नेमकी कशासाठी होती?, राजेश टोपे अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार का? यासंदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला
मात्र त्यांनी या भेटीबाबत बोलायला नकार दिला. यामुळे या भेटीत काय खलबंत झाले त्याची माहिती अजून समोर आली नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकांचा धडाका सकाळपासून पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये सुरु आहे.
रायगडावरील पक्ष चिन्हाच्या कार्यक्रमापूर्वी बैठकीत आत्या-भाचा म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी हजेरी लावली. या बैठकीला भल्या सकाळी
दोघे हजर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र पाणी प्रश्नासाठी बैठकीला आल्याचं दोघांनी स्पष्ट केल्याने अनेक राजकीय चर्चांना पूर्णविराम लागला.