मराठवाड्यातील ०५ तर महाराष्ट्रातील 18 उमेदवारांना निवडणूक आयोगाने घातली बंदी
05 candidates from Marathwada and 18 candidates from Maharashtra have been banned by the Election Commission

निवडणूक आयोगाकडून आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या पूर्वसंध्येला
निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यात, महाराष्ट्रातील एकूण 18 जणांचा समावेश आहे. निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले असून,
अशा लोकांची यादीच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या लोकांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही.
अवघ्या काही तासात निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
अनेकांनी कित्येक वर्षांपासून यासाठी तयारी केली आहे. मात्र, राज्यातील असे 18 लोकं आहेत, ज्यांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही.
कारण त्यांनी यापूर्वी लढवलेल्या निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने या 18 ही लोकांची यादीच जाहीर केली आहे.
अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी…
मोहम्मद मेहमूद सय्यद शाह : मुंबई उत्तर- मध्य विधानसभा मतदारसंघ
गायकवाड दिनकर धारोजी : जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी
अमर शालिकराम पांढरे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया
उमेशकुमार मुलचंद सरोटे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया
दीपक चंद्रभान गाडे : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ ठाणे
नरेंद्र धर्मा पाटील (साळुंखे) : सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ धुळे
मुदसरुद्दीन अलिमुद्दीन : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड
पांडुरंग टोलाबा वान्ने : लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेड
गोविंदा अंबर बोराळे : नांदगाव विधानसभा मतदारसंघ नाशिक
आव्हाड महेश झुंजार : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ नाशिक
हबीबुर रहमान खान : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ ठाणे
महेंद्र राजेंद्र बोराडे : बीड विधानसभा मतदारसंघ बीड
मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बाल : मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ मुंबई
विशाल दत्ता शिंदे : किनवट विधानसभा मतदारसंघ नांदेड
इम्रान बशर : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ नांदेड
सुमीत पांडुरंग बारस्कर : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई
ब्रिजेश सुरेंद्रनाथ तिवारी : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई
मोहम्मद इम्रान कुरेशी : चांदिवली विधानसभा मतदारसंघ मुंबई