शरद पवारांच्या मदतीसाठी प्रकाश आंबेडकरांनी घेतला मोठा निर्णय

Prakash Ambedkar took a big decision to help Sharad Pawar

 

 

 

 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात वारंवार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.

 

 

 

 

आता लोकसभा निवडणुकीत वंचितने पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेडकरांनी बारामतीतून पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

 

 

 

 

 

एकीकडे महाविकास आघाडीसोबत सूत जुळले नाही, तर दुसरीकडे पवारांना मदत करण्याच्या आंबेडकरांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

 

 

 

 

महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी वारंवार चर्चा केली. मात्र जागावाटपावरून त्यांच्यातील बोलणी फिसकटली. दरम्यान,

 

 

 

 

 

आंबेडकरांनी आघाडीच्या नेत्यांवर टीकाही केली. मात्र कोल्हापूर, नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी बारामतीतून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनाही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

 

आघाडीसोबत जुळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आंबेडकरांनी आपल्या उमेदवार घोषित केले आहेत. वंचितने तीन याद्यातून 24 लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

 

 

 

 

 

तीसऱ्या यादीत पुणे, शिरूरमधून उमेदवार दिले असले तरी बारामतीतून वंचितने उमेदवार दिला नाही. येथून त्यांनी सुळे यांना

 

 

 

 

पाठिंबा जाहीर केल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे. वंचितच्या पाठिंब्याने सुळेंना मोठी मदत झाल्याची चर्चा आहे.

 

 

 

 

वंचितने महाविकास आघाडीत सहभागी होऊन भाजपला रोखण्यास मदत करावी, अशी अपेक्षा शरद पवारांसह आघाडीतील नेत्यांची होती.

 

 

 

 

 

मात्र जागावाटपावरून त्यांच्यातील चर्चा पुढे गेली नाही. दरम्यान, शरद पवारांनी अकोल्यातून आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये असे काँग्रेसला सूचवले होते. मात्र काँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *