शरद पवारांना मोठा धक्का;सुप्रिया सुळेंचे प्रचारप्रमुखाचा अजित पवार गटात प्रवेश

Big shock to Sharad Pawar; Supriya Sule's campaign chief joins Ajit Pawar group

 

 

 

 

 

बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या बारामती मतदारसंघातील उमेदवार

 

 

 

खासदार सुप्रिया सुळेंना निवडणूक होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने अजित पवार गटामध्ये सहभागी झाले आहेत.

 

 

 

माने कुटुंब पवार कुटुंबीयांसोबत राहिलं आहे. अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी माने कुटुंब त्यांच्याबरोबर राहणार आहे, असं म्हणत मानेंनी आपल्या हाती घड्याळ बांधलं आहे.

 

 

 

 

अजित पवार हे विकसासाठी भाजप बरोबर गेले आहेत. आम्ही देखील विकास व्हावा यासाठी अजित पवार यांच्याबरोबर जात आहोत. अजित पवारांनी अनेक विकास कामे केली आहेत.

 

 

 

 

 

आम्ही ठामपणे अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून आम्ही त्यांचा प्रचार सुरू करत आहोत, अशा शब्दांत प्रवीण मानेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 

 

 

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय होवून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे

 

 

 

 

हात बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असंही प्रविण माने यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं.

 

 

 

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माने यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली होती. प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुक्यातील प्रचार प्रमुख होते .

 

 

 

 

शरद पवार गटाच्या सर्व निवडणुका माने यांच्या नेतृत्वाखाली होणार अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर करण्यात आले होते.

 

 

 

माने  अजित पवार गटात सहभागी झाल्यामुळे सुप्रिया सुळे यांना तो मोठा धक्का आहे. असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

 

 

 

 

काही दिवसांपूर्वी त् सुळे यांच्या प्रचारार्थ कोपरा बैठकांचे आयोजन केले होते, मात्र अचानक शरद पवारांच्या सभेला प्रवीण माने व त्यांचे वडील दशरथ माने उपस्थित नव्हते,

 

 

 

 

तेव्हापासून इंदापूर तालुक्यात अजित पवार गटात प्रवेश करतील, अशा चर्चा सुरु आहेत. माने आज काय भूमिका घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते .

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *