10,11,12 एप्रिल रोजी कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस ?पाहा कृषी विद्यापीठाचा हवामान अंदाज

Which district will rain on April 10, 11, 12? See the weather forecast of the University of Agriculture

 

 

 

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

दिनांक 08 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, धाराशिव व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी, दिनांक 09 एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी,

 

 

 

 

दिनांक 10 व 11 एप्रिल रोजी बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात काही ठिकाणी, दिनांक 12 एप्रिल रोजी बीड, लातूर, धाराशिव,

 

 

 

नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

 

दिनांक 08 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, धाराशिव व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी, दिनांक 09 एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी,

 

 

 

 

 

दिनांक 10 व 11 एप्रिल रोजी बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात काही ठिकाणी, दिनांक 12 एप्रिल रोजी बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी

 

 

 

 

 

 

वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

 

 

 

 

सामान्य सल्ला:

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 12 ते 18 एप्रिल दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

 

 

 

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 10 ते 16 एप्रिल 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

संदेश :

तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

 

 

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

 

 

 

पीक व्‍यवस्‍थापन

दिनांक 8 ते 12 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, मळणी केलेल्या मालाची (हरभरा, रब्बी ज्वारी, करडई) सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

 

 

 

मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. दिनांक 8 ते 12 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता,

 

 

 

 

काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा.

 

 

 

 

काढणी/मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. दिनांक 8 ते 12 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता,

 

 

 

सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.

 

 

 

 

वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.

 

 

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी. संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

 

 

 

 

 

दिनांक 8 ते 12 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेमध्‍ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्‍यावी.

 

 

 

 

काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी. चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी चिकू फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.

 

 

 

 

 

भाजीपाला

दिनांक 8 ते 12 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांची काढणी करून घ्यावी.

 

 

 

 

उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. टरबूज व खरबूज पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास कामगंध सापळे वापरावेत.

 

 

 

 

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

 

 

 

 

चारा पीके

दिनांक 8 ते 12 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

 

 

 

 

 

पशुधन व्यवस्थापन

दिनांक 8 ते 12 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

 

 

 

 

सामुदायिक विज्ञान

स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका. जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.

 

 

 

 

 

कृषि अभियांत्रिकी

रब्बी पिकांची कापणी झाल्यानंतर शेतात नांगरणी करून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील मातीचे माती परिक्षण करून घ्यावे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *