महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ? काय सांगतो सर्व्हे?

Which party will get how many seats in Maharashtra? What does the survey say?

 

 

 

 

 

देशात 400 हून अधिक जागा मिळवण्यासाठी राज्यात महायुतीचे मिशन 45 टार्गेट आहे. त्यासाठी भाजपने काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना आपल्या गोटात ओढले आहे.

 

 

 

आता नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनीही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्यान देशभरात बलशाली होत असतानाही

 

 

 

महायुतीला राज्यासह जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. लोकपोल सर्व्हेनुसार राज्यात महायुतीच्या जागांत घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

 

 

 

 

लोकपोल सर्व्हेनुसार राज्यातील सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. महायुतील निवडणुकीत 21 ते 24 जागा मिळण्याची शक्यता आहेत.

 

 

 

त्यातील 14-17 जागा या फक्त भाजपच्या असतील, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे. तर विरोधातील महाविकास आघाडीला बूस्ट मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

लोकसभेत आघाडीला 23-26 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यातील 9-12 जागा या काँग्रेसच्या असल्याचा अंदाज आहे.

 

 

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रित लढली होती. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती. त्यावेळी युतीच्या वाट्याला 41 तर जागा होत्या.

 

 

 

त्यातील 23 जागा भाजपच्या तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. आघाडीतील राष्ट्रवादीला चार तर काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली होती.

 

 

 

आता बदलेल्या राजकीय स्थितीत लोकपोलनुसार राज्यातील युतीच्या जागा गत निवडणुकीपेक्षा कमी होणार आहेत.तर महाविकास आघडीच्या जागा काहीशा वाढणार आहेत.

 

 

ABP CVoter नुसार महाविकास आघाडीला ४२ टक्क्यांसह 20 मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी महायुतीला 43 टक्के मतांसह 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

 

 

 

तर न्यूज 18 च्या सर्व्हनुसार महाविकास आघाडीला 41 तर महायुतीला एनडीएला फक्त सात जागा मिळण्याची शक्यता आहे. टाईम्स नाऊ ईटीजीनुसार, महायुतील 34-38 तर आघाडीला 9-13 जागा मिळतील.

 

 

 

 

इंडिया टीव्ही CNX नुसार युतीला 35 जागा तर ५३ टक्के मते मिळतील, तर आघाडीला 35 टक्के मतांसह 13 जागा मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *