जितका मोठा भ्रष्ट, त्याचा भाजपमध्ये प्रवेश; सुषमा अंधारेंची टीका
The bigger the corrupt, the more he joins the BJP; Criticism of Sushma Andharen
‘भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर भारतीय जनता पक्ष गप्पा मारीत आहे; परंतु, जितका मोठा भ्रष्टाचारी तितका मोठा त्याचा भाजपमध्ये प्रवेश होतो,’ अशी टीका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘यापूर्वी केलेल्या घोषणांचे काय झाले? किती आश्वासनांची पूर्तता केली? याचे उत्तर भाजपने द्यावे.
दोन कोटी रोजगारनिर्मितीचे काय झाले? इंदू मिल स्मारकाचे काय झाले? महागाई कमी करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? याची उत्तरे द्यावीत.
त्यानंतर त्यांनी नव्या संकल्प पत्रावर बोलावे. आश्वासने देऊन ती न पाळणे ही भाजपची पद्धत झाली आहे. त्यांच्या प्रचाराला मतदार भूलणार नाहीत. घराणेशाहीवर बोलण्यापूर्वी त्यांनी दिलेले उमेदवार पाहिले पाहिजेत.’
या वेळी उमेदवार वाघेरे-पाटील, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, योगेश बाबर, मानव कांबले, चेतन बेंद्रे, सुलक्षणा शीलवंत, मारुती भापकर या वेळी उपस्थित होते.
इंजिनदादा इंजिनदादा काय करता? मांडवली करतो, पाठिंबा देतो, बिनशर्त म्हणतो; सुषमा अंधारेंची विडंबन कविता
महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी देहूरोड येथील श्री गुरू सिंगसभा गुरुद्वाराला भेट दिली. शीख बांधवांशी संवाद साधला. समुदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गुरुद्वारामधील लंगरमध्ये वाघेरे-पाटील सहभागी झाले.