देवेंद्र फडणवीसांनी येण्यासाठी स्पेशल विमान पाठवले पण “हा” नेता गेला थेट शरद पवारांच्या भेटीला
Devendra Fadnavis sent a special plane to come but this plane went directly to meet Sharad Pawar
लोकसभा निवडणुकीसाठी धुरळा उडाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्व टिकवण्यासाठी शरद पवारांनी डाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
पक्षफुटीनंतर बॅकफूटवर गेलेले शरद पवार महायुतीतील नाराजांच्या मदतीनं भाजपला शह देण्याच्या प्रयत्नात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून
भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटलांची घरवापसी घडवून आणणारे राजकारणातले वस्ताद शरद पवार आता माढ्यात पुन्हा नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील धनगर नेते उत्तमराव जानकर महायुतीवर नाराज होते. भाजपनं आपल्याला माढ्यातून निवडणुकीची तयारी करायला सांगितली होती.
पण उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचं जानकरांनी सोमवारी सांगितलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतलेले धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याचा विचार जानकरांकडून सुरू आहे.
याची कुणकुण लागताच भाजपकडून देवेंद्र फडणवीस ऍक्टिव्ह झाले. त्यांनी जानकरांसाठी बारामतीला स्पेशल चार्टर्ड प्लेन पाठवलं. त्यांना नागपुरात चर्चेसाठी बोलावलं. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
देवेंद्र फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगणारे उत्तमराव जानकर आज शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटीलदेखील आहेत.
परवा फडणवीसांना भेटलो. आज शरद पवारांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे. आज शरद पवारांसोबत चर्चा करू. मग कार्यकर्त्यांसोबत बोलून १९ एप्रिलला निर्णय घेऊ,
असं जानकरांनी पवारांच्या भेटीला जाताना सांगितलं. आम्ही कुठे जाणार ते आम्हालाच माहिती नाही. आम्हाला समजलं की तुम्हाला सांगतो, असं जानकर म्हणाले.
माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००८ मध्ये झाली. २००९ मध्ये इथून शरद पवार निवडून आले. तर २०१४ मध्ये विजयसिंह मोहिते पाटील मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.
२०१९ मध्ये इथून रणजीतसिंह नाईक निंबाळकर भाजपकडून निवडून आले. त्यावेळी मोहिते पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आता भाजपनं पुन्हा एकदा निंबाळकरांना तिकीट दिल्यानं मोहिते पाटील नाराज झाले.
विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील यांनी भाजप सोडत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आणि लोकसभेचं तिकीट मिळवलं.