राजस्थानमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या, शनिवारी मतदान

Campaign guns go cold in Rajasthan, voting on Saturday

 

 

 

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस होता. यानंतर आता कुठेही रोड शो, मिरवणूक, रॅली, सभा इत्यादी आयोजित करण्यास परवानगी मिळणार नाही. कोणताही उमेदवार प्रचार करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.

 

 

 

आज (२३ नोव्हेंबर) निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसने आपली पूर्ण ताकद लावली होती.

 

 

दोन्ही पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी आज राजस्थानमध्ये येऊन जाहीर सभा आणि रॅलींना संबोधित केलं. आज राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे असे अनेक बडे नेते प्रचाराच्या रणांगणात दिसले.

 

 

 

यातच राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला मतदान होणार असून राजस्थानसह पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.

 

 

मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 126 नुसार, 23 नोव्हेंबर रोजी

 

 

संध्याकाळी 6.00 वाजल्यापासून सुरू होणारा 48 तासांचा कालावधी आणि मतदान संपण्याची निश्चित केलेली मुदत 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत राहणार आहे.

 

 

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी राजसमंदच्या देवगडमध्ये जाहीर सभेत पोहोचले. येथील विजय संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की,

 

 

 

अलीकडेच मला राजस्थानच्या कानाकोपऱ्यात फिरायला मिळाले. ‘गहलोत जी, कोनी मिले वोट जी’ हीच गोष्ट सर्वत्र ऐकायला मिळते.

 

 

ते म्हणाले की, या निवडणुकीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे आमच्या माता-भगिनींनी यावेळी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यापेक्षा जास्त महिला विरोधी सरकार राजस्थानने पाहिले नाही.

 

 

 

त्यामुळे राजस्थानच्या जनतेने काँग्रेस सरकार उलथून टाकण्याचा संकल्प केला आहे. देवगडमधील सभेत पंतप्रधान मोदींनी दावा केला की, आता राजस्थानमध्ये गेहलोत सरकार कधीही परतणार नाही.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *