धाकधूक वाढली;पाहा 48 मतदारसंघातील प्रमुख लढती आणि झालेले मतदारसंघनिहाय मतदान

Intimidation Rises; See Key Contests in 48 Constituencies and Constituency wise Polling

 

 

 

 

 

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणाऱ्या दोन मोठ्या घटना 2022 आणि 2023 मध्ये घडल्या. याआधीच्या इतिहासात मूळ पक्ष सोडून इतर पक्षात जाणाऱ्यांची संख्या मोठी असायची.

 

 

 

पण, एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची स्थापन केलेल्या शिवसेना पक्षात उठाव करून पक्षच आपल्या ताब्यात घेतला.

 

 

तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करून राष्ट्रवादी पक्षावर हक्क सांगितला. निवडणुका आयोगाने विधान सभेतील आमदारांच्या बळावर शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या हाती सुपूर्द केला.

 

 

 

 

या दोन मोठ्या घडामोडीनंतर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी ( अजित दादा गट ) यांची महायुती या निवडणुकांना एकत्रितपणे सामोरी गेली.

 

 

 

 

तर, इकडे हातातून पक्ष गेलेले उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी कॉंग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीला शह देण्याचा प्रयत्न केला.

 

 

शिंदे, अजितदादा यांच्याकडे मूळ पक्ष आणि चिन्ह आले असले तरी जनतेच्या मनात कोणता पक्ष आहे हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिसून येणार आहे.

 

 

 

त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की उपमुख्यमंत्री अजित पवार असो या दोन्ही नेत्यांचा कस या लोकसभा निवडणुकीत लागणार आहे.

 

 

 

महाराष्ट्राच्या लोकसभेच्या 48 जागांसाठी महायुतीमधील तीन पक्षांमध्ये भाजपने 28, शिवसेना (शिंदे गट) 15 तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 05 जागा लढविल्या. तर महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 23, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 15 आणि काँग्रेसने 10 जागा लढविल्या.

 

 

 

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या रणसंग्रामात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीही उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीने या लोकसभा निवडणुकीत 35 जागा लढविल्या आहेत.

 

 

 

महाविकास आघाडीने जागावाटपामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा दिल्या आहेत. मात्र, सांगलीमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झाली.

 

 

 

चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतानाही काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे.

 

 

 

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडल्यानंतर राज्यात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यातच राज्यात मतदानाचे प्रमाण वाढले आहे. 2024 च्या निवडणुकीत राज्यातील काही जागांवर मतदानाची टक्केवारी वाढली.

 

 

 

 

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत लोकसभेच्या अशा अनेक जागा की जिथे मतदानात वाढ झाली आहे. तर, काही जागांवर कमी मतदानही झाले आहे.

 

 

 

त्याचप्रमाणे 2019 च्या तुलनेत 2024 मधील एकूण मतदारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. राज्यातील सहा मतदारसंघात मतदार वाढले आहेत. त्याचा फायदा कुणाला मिळणार याची उत्सुकता आहे.

 

 

 

मतदार वाढलेले सहा मतदारसंघ;भिवंडी लोकसभा मतदारसंघ : 2019 मध्ये या मतदारसंघात 1002763 मतदार होते. 2024 च्या निवडणुकीत 2,47,327 इतके मतदार वाढून ही संख्या 12,50,099 इतकी झाली. त्यामुळे येथे 6.83% इतके मतदान वाढल्याची नोंद झाली आहे.

 

 

 

 

 

कल्याण लोकसभा मतदारसंघ : या मतदारसंघात 2019 मध्ये 8,87,955 इतके मतदार होते. 2024 मध्ये 10,43,610 इतके मतदार झाले. म्हणजेच ही संख्या 1,55,655 इतकी वाढली. परिणामी 4.93% इतके मतदान वाढले.

 

 

 

 

बीड लोकसभा मतदारसंघ : 2024 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी या मतदारसंघात 4.82% इतकी वाढली. 1,70,388 इतके मतदार या मतदारसंघात वाढले. 2019 मध्ये 13,49,138 इतके मतदार होते ती संख्या वाढून 2024 मध्ये 15,19,526 इतकी झाली.

 

 

 

 

जालना लोकसभा मतदारसंघ : 2019 मध्ये 12,03,821 इतक्या असलेल्या मतदारांची संख्या वाढून 2024 मध्ये ती 13,61,226 इतकी झाली. या मतदार संघात 1,57,405 इतके मतदार वाढले. या निवडणुकीत येथे 4.63% इतके मतदान वाढले.

 

 

 

 

 

 

वर्धा लोकसभा मतदारसंघ : 2024 च्या निवडणुकीत या मतदारसंघात 24,193 मतदार वाढले. 2019 मध्ये 10,67,158 इतके मतदार होते.

 

 

 

 

वाढलेल्या मतदारांमुळे हा आकडा 2024 मध्ये 10,91,351 इतका झाला. यंदाच्या निवडणुकीत त्यामुळे मतदानाची टक्केवारी 3.59% इतकी वाढली.

 

 

 

शिरूर लोकसभा मतदारसंघ : 2019 मध्ये 12,90,395 इतके असलेले मतदार वाढून 2024 मध्ये 13,75,593 इतके झाले. 85,198 मतदार वाढल्याने मत्दांची आकडेवारीही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 5.21% नी वाढली.

 

 

 

 

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडली. निवडणूक आयोगाने राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवर कुठे आणि किती मतदान झाले याची आकडेवारी जाहीर केली आहे.

 

 

मात्र, या निवडणुकीतील काही प्रमुख लढतींकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. यात पहिला नंबर आहे तो बारामती मतदार संघाचा. बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार यांच्या या मतदारसंघाचे नेतृत्व सध्या त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे करत आहेत.

 

 

 

मात्र, या अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत उतरविले आहे. त्यामुळे येथे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे.

 

 

 

त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), नारायण राणे (रत्नागिरी सिंधुदुर्ग), कपिल पाटील (भिवंडी), डॉ. भारती पवार (दिंडोरी), पियूष गोयल (उत्तर मुंबई), रावसाहेब दानवे (जालना), मंत्री सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (कल्याण), भाजप नेत्या पंकजा मुंडे (बीड), छत्रपती शिवाजी महाराज यांचे दोन वंशज छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती उदयनराजे भोसले, अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या महत्वाच्या लढती आहेत.

 

 

 

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधील फुटीनंतर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत काही जागांवर होत आहे. तर भाजप आपला पारंपारिक विरोधक कॉंग्रससमोर उभा ठाकला आहे. लोकसभेच्या ४८ जागांवर पक्षनिहाय कशी लढत असेल यावर एक नजर

 

 

 

 

 

13 मतदारसंघात ठाकरे -शिंदे यांच्या शिवसेनेत लढत

 

उत्तर पश्चिम ( मतदान 54.84% ) – रविंद्र वायकर ( शिवसेना ) विरुद्ध अमोल कीर्तीकर ( ठाकरे गट )

दक्षिण मध्य ( मतदान 53.60% ) – राहुल शेवाळे ( शिवसेना ) विरुद्ध अनिल देसाई ( ठाकरे गट )

दक्षिण मुंबई ( मतदान 50.06 % ) – यामिनी जाधव ( शिवसेना ) विरुद्ध अरविंद सावंत ( ठाकरे गट )

 

 

 

ठाणे ( मतदान 52.09% ) – नरेश म्हस्के ( शिवसेना ) विरुद्ध राजन विचारे ( ठाकरे गट )

कल्याण ( मतदान 50.12% ) – श्रीकांत शिंदे ( शिवसेना ) विरुद्ध वैशाली दरेकर ( ठाकरे गट )

नाशिक ( मतदान 60.75% ) – हेमंत गोडसे ( शिवसेना ) विरुद्ध राजाभाऊ वाजे ( ठाकरे गट )

 

 

 

 

औरंगाबाद ( मतदान 63.03% ) – संदिपान भुमरे ( शिवसेना ) विरुद्ध चंद्रकांत खैरे ( ठाकरे गट )

हिंगोली ( मतदान 63.54% ) – बाबूराव कदम ( शिवसेना ) विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर ( ठाकरे गट )

बुलडाणा ( मतदान 62.03% ) – प्रतापराव जाधव ( शिवसेना ) विरुद्ध नरेंद्र खेडेकर ( ठाकरे गट )

 

 

 

 

यवतमाळ – वाशिम ( मतदान 62.87% ) – राजश्री पाटील ( शिवसेना ) विरुद्ध संजय देशमुख ( ठाकरे गट )

हातकणंगले ( मतदान 55.12% ) – धैर्यशील माने ( शिवसेना ) विरुद्ध सत्यजीत पाटील ( ठाकरे गट )

 

 

 

 

मावळ ( मतदान 54.87% ) – श्रीरंग बारणे ( शिवसेना ) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील ( ठाकरे गट )

शिर्डी ( मतदान 63.03% ) – सदााशिव लोखंडे ( शिवसेना ) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे ( ठाकरे गट )

 

 

 

 

राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध अजित पवार लढत

 

बारामती ( बारामती – मतदान 53.08% ) – सुनेत्रा पवार ( राष्ट्रवादी ) विरुद्ध सुप्रिया सुळे ( पवार गट )

शिरुर ( मतदान 54.16% ) – शिवाजी आढळराव पाटील ( राष्ट्रवादी ) विरुद्ध डॉ. अमोल कोल्हे ( पवार गट )

 

 

 

 

भाजप विरुद्ध कॉंग्रेस

 

उत्तर मुंबई ( मतदान 57.02%) – पियूष गोयल ( भाजप ) विरुद्ध भूषण पाटील ( कॉंग्रेस )

उत्तर मध्य मुंबई ( मतदान 51.98% ) – उज्वल निकम ( भाजप ) विरुद्ध वर्षा गायकवाड ( काँग्रेस )

नंदुरबार ( मतदान 70.68% ) – डॉ. हिना गावित (भाजप) विरुद्ध गोपाल पाडवी ( काँग्रेस )

 

 

 

धुळे ( मतदान 60.21% ) – सुभाष भामरे ( भाजप ) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव ( काँग्रेस )

जालना ( मतदान 69.18% ) – रावसाहेब दानवे ( भाजप ) विरुद्ध डॉ. कल्याण काळे ( काँग्रेस )

लातूर ( मतदान 63.32% ) – सुधाकर श्रृंगारे ( भाजप ) विरुद्ध शिवाजीराव काळगे ( काँग्रेस )

 

 

 

 

नांदेड ( मतदान 60.94% ) – प्रताप पाटील चिखलीकर ( भाजप ) विरुद्ध वसंतराव चव्हाण ( काँग्रेस )

अकोला ( मतदान 61.79% ) – अनुप धोत्रे ( भाजप ) विरुद्ध अभय पाटील ( काँग्रेस )

अमरावती ( मतदान 63.67% ) – नवनीत राणा ( भाजप ) विरुद्ध बळवंत वानखेडे ( काँग्रेस )

 

 

 

नागपूर ( मतदान 54.32% ) – नितीन गडकरी ( भाजप ) विरुद्ध विकास ठाकरे ( काँग्रेस )

भंडारा-गोंदिया ( मतदान 67.04% ) – सुनील मेंढे ( भाजप ) विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे ( काँग्रेस )

गडचिरोली-चिमूर ( मतदान 71.88% ) – अशोक नेते ( भाजप ) विरुद्ध डॉ. नामदेव किरसान ( काँग्रेस )

 

 

 

 

चंद्रपूर ( मतदान 67.55% ) – सुधीर मुनगंटीवार ( भाजप ) विरुद्ध प्रतिभा धानोरकर ( काँग्रेस )

पुणे ( मतदान 53.54% ) – मुरलीधर मोहोळ ( भाजप ) विरुद्ध रविंद्र धंगेकर ( काँग्रेस )

सोलापूर ( मतदान 53.91% ) – राम सातपुते ( भाजप ) विरुद्ध प्रणिती शिंदे ( काँग्रेस )

 

 

 

 

भाजप विरुद्ध शरद पवार गटाची  लढत

 

भिवंडी ( मतदान 59.89% ) – कपिल पाटील ( भाजप ) विरुद्ध सुरेश म्हात्रे ( पवार गट )

दिंडोरी ( मतदान 66.75% ) – डॉ. भारती पवार ( भाजप ) विरुद्ध भास्करराव भगरे ( पवार गट )

 

 

 

 

 

रावेर ( मतदान 64.28% ) – रक्षा खडसे ( भाजप ) विरुद्ध श्रीराम पाटील ( पवार गट )

बीड ( मतदान 70.92% ) – पंकजा मुंडे ( भाजप ) विरुद्ध बजरंग सोनवणे ( पवार गट )

 

 

 

 

 

वर्धा ( मतदान 64.85% ) – रामदास तडस ( भाजप ) विरुद्ध अमर काळे ( पवार गट )

माढा ( मतदान 54.72% ) – रणजितसिंह नाईक निंबाळकर ( भाजप ) विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील ( पवार गट )

 

 

 

 

सातारा ( मतदान 57.38% ) – उदयनराजे भोसले ( भाजप ) विरुद्ध शशिकांत शिंदे ( पवार गट )

अहमदनगर ( मतदान 66.61% ) – सुजय विखे पाटील ( भाजप ) विरुद्ध निलेश लंके ( पवार गट )

 

 

 

 

 

भाजप विरुद्ध ठाकरे गट लढत

 

मुंबई उत्तर पूर्व ( मतदान 56.37% ) – मिहीर कोटेचा ( भाजप ) विरुद्ध संजय दिना पाटील ( ठाकरे गट )

पालघर ( मतदान 63.91% ) – डॉ. हिमंत सावरा ( भाजप ) विरुद्ध भारती कामडी ( ठाकरे गट )

 

 

 

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग ( मतदान 55.68% ) – नारायण राणे ( भाजप ) विरुद्ध विनायक राऊत ( ठाकरे गट )

जळगाव ( मतदान 58.47% ) – स्मिता वाघ ( भाजप ) विरुद्ध करण पवार ( ठाकरे गट )

 

 

 

 

 

सांगली ( मतदान 62.84% ) – संजयकाका पाटील ( भाजप ) विरुद्ध चंद्रहार पाटील ( ठाकरे गट )

राष्ट्रवादीचा ( अजितदादा गट ) होणार ठाकरे गटाशी सामना

 

 

 

 

रायगड ( मतदान 56.72% ) – सुनील तटकरे ( राष्ट्रवादी ) विरुद्ध अनंत गीते ( ठाकरे गट )

धाराशिव ( मतदान 62.45% ) – अर्चना पाटील ( राष्ट्रवादी ) विरुद्ध ओमराजे निंबाळकर ( ठाकरे गट )

 

 

 

 

 

परभणी ( मतदान 62.26% ) – महादेव जानकर ( राष्ट्रवादी ) विरुद्ध संजय जाधव ( ठाकरे गट )

 

 

 

 

शिवसेना शिंदे -कॉंग्रेस

 

रामटेक ( मतदान 61.01% ) – राजू पारवे ( शिवसेना ) विरुद्ध श्यामकुमार बर्वे ( काँग्रेस )

कोल्हापूर ( मतदान 56.18% ) – संजय मंडलिक ( शिवेसना ) विरुद्ध शाहू महाराज छत्रपती ( काँग्रेस )

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *