मोदी सरकार शेवटच्या टप्प्यात ;! बहुमताचा आकडा दूर; 6 मंत्री पिछाडीवर

Modi government in the last stage;! away from the majority figure; 6 ministers behind

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता हळूहळू स्पष्ट होत आहेत. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला.

 

 

 

 

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीला बहुमत मिळालं आहे. पण 400 पारचा नारा देणारा भाजपला मात्र बहुमताचा आकडा गाठणंही कठीण होऊन बसलं आहे.

 

 

 

भाजप बहुमताच्या आकड्यापासून बराच दूर आहे. तसंच काँग्रेसच नेतृत्वात इंडिया आघाडीही जबरदस्त टक्कर देत आहे.

 

 

भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला 300 पेक्षा जास्त जागांच्या आघाडीसह पूर्ण बहुमत मिळत असल्याचं दिसतं. त्याच वेळी, इंडिया अलायन्स देखील कडवी टक्कर देत असून 200 जागांवर आघाडीवर आहे.

 

 

 

 

पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये काँटे की टक्कर आहे. तर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे.

 

 

 

दिल्लीत एनडीए-भारत आघाडीमध्ये 6-1 अशी लढत होत आहे. तर हरयाणात दोन्ही आघाड्या प्रत्येकी 4 जागांवर आघाडीवर आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे.

 

 

 

बिहारमधील लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जेडीयू बिग ब्रदर बनताना दिसत आहे. इथं 40 जागांच्या ट्रेंडमध्ये जेडीयू 15 जागांवर आघाडीवर आहे.

 

 

 

 

तर भाजपची 11 जागांवर आघाडी आहे. एनडीएच्या इतर मित्रपक्षांपैकी एलजेपी 5 जागांवर आघाडीवर आहे. तर विरोधी इंडिया आघाडी 8 जागांवर आघाडीवर आहे.

 

 

यामध्ये आरजेडी 4 जागांवर, सीपीआय-एमएल 2 जागांवर तर काँग्रेस आणि सीपीआय प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने सुरुवातीच्या टप्प्यात 25 पैकी 12 जागांवर आघाडी घेतली आहे.

 

 

 

 

तर भाजप 13 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या दहा वर्षांपासून राजस्थानमधील सर्व जागांवर भाजपचा ताबा होता. अशा स्थितीत 12 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आल्यानंतर भाजप नेते चिंतेत आहेत.

 

 

 

 

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागांवर भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये कडवी टक्कर आहे . सकाळी 10 वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 40 जागांवर आघाडीवर आहे,

 

 

 

तर इंडिया आघाडी 39 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, अनेक महत्त्वाच्या जागांवर भाजपचे प्रमुख नेते पिछाडीवर आहेत, त्यात स्मृती इराणी आणि मनेका गांधी यांच्यासोबत अरुण गोविल यांचाही समावेश आहे.

 

 

एनडीएनं बहुमताचा आकडा पार केला आहे. पण एनडी 300 पेक्षा कमी सीटवर आघाडीवर आहे. आतापर्यंत एनडीए 298 तर इंडिया आघाडी 223 जागांवर पुढे आहे.

 

 

 

भाजपची 238 सीट्सवर आघाडी आहे. बहुमताचा आकडा 272 आहे. म्हणजे भाजपनं बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचलेलं नाही.

 

 

लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचे 6 मंत्री पिछाडीवर आहेत. यामध्ये स्मृती इराणी, नारायण राणे, इंद्रजीत सिंह, नित्यानंद राय आणि गिरिराज सिंह यांचा समावेश आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आघाडीवर आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *